शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आंतर क्लब पिकलबॉल स्पर्धा; यजमान पीटीकेएस संघाने राखले निर्विवाद वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 03:19 IST

साखळी फेरीत जेएमडीवायसी संघाने तुफानी खेळ करताना आपले तिन्ही सामने जिंकत दिमाखात अंतिम फेरीत गाठली. यानंतर पीटीकेएस संघाने निर्णायक सामन्यात एमबीपीए संघाचा ११-४ असा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम लढतीत दोन्ही संघांनी प्रत्येकी ५ लढती जिंकताना सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचवली.

मुंबई : अत्यंत चुरशीच्या झालेल्या पिकलबॉल अंतिम सामन्यात मोक्याच्यावेळी खेळ उंचावलेल्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल (पीटीकेएस) संघाने जय मंगलदीप यूथ क्लब (जेएमडीवायसी) संघाचे कडवे आव्हान ८-७ असे परतावले. यासह पीटीकेएस संघाने यंदाच्या मोसमातील पहिल्या आंतर क्लब पिकलबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.कर्जत येथील पुष्पा स्पोर्ट्स अकॅडमी येथे पीटीकेएसच्या यजमानपदाखाली झालेल्या या स्पर्धेत चार संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मिरा भाईदर पिकलबॉल असोसिएशन (एमबीपीए) आणि पिकलबॉल कम्युनिटी क्लब (पीसीसी) या संघांचाही समावेश होता. प्रत्येक संघाला साखळी फेरीत एकमेकांविरुद्ध १५ लढती खेळण्याची संधी मिळाली. पीटीकेएसचे चेअरमन आणि हौशी पिकलबॉल महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरविंद प्रभू यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.साखळी फेरीत जेएमडीवायसी संघाने तुफानी खेळ करताना आपले तिन्ही सामने जिंकत दिमाखात अंतिम फेरीत गाठली. यानंतर पीटीकेएस संघाने निर्णायक सामन्यात एमबीपीए संघाचा ११-४ असा धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम लढतीत दोन्ही संघांनी प्रत्येकी ५ लढती जिंकताना सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचवली. मात्र येथून यजमान पीटीकेएस संघाने सामन्यावर पकड मिळवत सलग दोन लढती जिंकताना ७-५ अशी भक्कम आघाडी मिळवली.जेएमडीवायसीनेही लढवय्या खेळ करताना ६-७ अशी पिछाडी भरुन काढली. यानंतर आणखी एक दुहेरीचा सामना जिंकत पीटीकेएस संघाने ८-६ अशी विजयी आघाडी घेत जेतेपद निश्चित केले. यानंतरचा अखेरचा औपचारिक सामना जेएमडीवायसीने जिंकला खरा, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पीटीकेएस संघाकडून अनिकेत दुर्गावळी, अभिषेक सप्रे, सुहास कोकाटे, समीर ओक, यश देशमुख आणि निखिल मथुरे यांनी, तर जेएमवायडीसी संघाकडून सचिन पाटील, प्रशांत राऊळ, कपिल रमुका, मनोज जाधव, अनुराग नायर यांनी चमकदार खेळ केला.