न्यूयॉर्क : खेळताना आवश्यक असणारी मानसिक एकाग्रता आपण स्टेफी ग्राफकडून शिकलो असे मत तीन वेळेची युएस ओपन चॅम्पियन सेरेना विल्यम्सने व्यक्त केले. सेरेनाने युएस ओपन स्पर्धेत रशियाच्या वितालियाला हरवून विजयी अभियान सुरु केले. अमेरिकन ओपनमधील तिचा हा सलग २२ वा विजय आहे. १९८८ नंतर ती पहिल्यांदाच कॅलेंडर स्लॅम जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. १९८८ मध्ये स्टेफी ग्राफने ही कामगिरी केली होती. याबरोबरच ती स्टेफीच्या २२ ग्रँडस्लॅम विजयाच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून केवळ एक ग्रँडस्लॅम विजय दूर आहे.
स्टेफीकडून मानसिक दृढतेची प्रेरणा : सेरेना
By admin | Updated: September 2, 2015 00:05 IST