शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
4
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
5
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
7
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
8
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
9
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
10
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
11
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
12
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
13
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
14
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
15
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
16
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
17
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
18
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
19
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
20
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर

भारत-बांगला पत्रकारांचा दबदबा

By admin | Updated: March 16, 2015 23:51 IST

वर्ल्डकपचे वृत्तांकन करण्यासाठी भारताचा प्रसारमाध्यमांचा ५० प्रिंट, ईलेक्ट्रॉनिक्स, फोटो आणि व्हिडिओ पत्रकांरांचा सर्वात मोठा चमू आॅस्टे्रलियामध्ये दाखल झालेला आहे.

मेलबोर्न : वर्ल्डकपचे वृत्तांकन करण्यासाठी भारताचा प्रसारमाध्यमांचा ५० प्रिंट, ईलेक्ट्रॉनिक्स, फोटो आणि व्हिडिओ पत्रकांरांचा सर्वात मोठा चमू आॅस्टे्रलियामध्ये दाखल झालेला आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे बांगलादेशचा पत्रकार चमू देखील ४० सदस्यांसह येथे उपस्थित आहे. बांगला पत्रकांरांना आशा आहे की आपले ‘टायगर्स’ बलाढ्य भारताला धक्का देतील. त्याचवेळी बांगलादेश क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष नजमुल हसन उपांत्यपूर्व फेरीतील भारत वि. बांगलादेश सामना पाहण्यासाठी आॅस्टे्रलियामध्ये उपस्थित राहणार आहेत. जर का भारताला नमवून बांगलादेश सेमी फायनलला पोहोचला तर बांगला खेळाडूंसाठी मोठ्या रक्कमेची घोषणा केली जाऊ शकते. (वृत्तसंस्था)नातेवाईकांचा जलवावर्ल्डकपमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुध्द सलग दोन शतक झळकावल्यानंतर महमूदुल्लाह बांगलादेशमध्ये सर्वांचा आवडता खेळाडू बनला आहे. मात्र क्रिकेट विश्वात ‘रयाध’ टोपण नावाने ओळखला जात असलेला हा खेळाडू मागील दोन वर्षांपासून कठीण काळाशी झगडत होता. त्यामुळे संघातील त्याच्या जागाविषयी शंका निर्माण केली जात होती. त्याचवेळि या कठीण प्रसंगी त्याची केवळ एकाच व्यक्तीने नेहमि साथ दिली आणि ती व्यक्ती म्हणजे संघाचा माजी कर्णधार मुशफिकुर रहिम. महमूदुल्लाह आणि रहिम यांनी इंग्लंड विरुध्द निर्णायक भागीदारी केली होती. हे दोघेही चांगले मित्र असून विशेष म्हणजे दोघांच्या पत्नी बहीणी असून त एकमेकांचे नातेवाईक देखील आहेत. त्यामुळे या दोघांचा खेळ देखील चांगलाच बहरत आहे.रुबेलने वेधले प्रसारमाध्यमांचे लक्षमेलबर्न : बांगलादेशच्या सराव सत्राच्यावेळी भारतीय प्रसारमाध्यमांचे सर्वाधिक लक्ष वेगवान गोलंदाज रुबेल हुसैन याने खेचले. आपल्याच देशाच्या एका अभिनेत्रीसोबत सुरु असलेल्या कथित वादामुळे सध्या रुबेल चर्चेत आहे. इंग्लंड विरुध्द शेवटच्या दोन षटकांत दोन बळी घेत संघाला विजय मिळवून देणारा रुबेल रातोरत हिरो झाला आणि हिथ स्ट्रीक पासून प्रशिक्षक चंदिका हथुरासिंघे सर्वांनीच त्याचा बचाव केला. हथुरासिंघेने सांगितले की, आॅस्टे्रलियामध्ये आल्यापासून आम्ही रुबेलशी त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळेचे त्याचे पुर्ण लक्ष केवळ क्रिकेटकडे लागले. त्याच्याशी आम्ही केवळ क्रिकेट बाबतच बोलतो. तो एक व्यावसायिक खेळाडू असून त्यानुसार तो संघामध्ये मिसळला आहे, असेही हथुरासिंघे यांनी सांगितले.