शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

भारताचा दणदणीत विजय

By admin | Updated: October 16, 2016 20:34 IST

उमेश यादव आणि हार्दिक पांड्याच्या धारधार आणि अचूक टप्याच्या गोलंदाजीपुढे न्युझीलंडचे फलंदाज अपयशी ठरले आहेत.

ऑनलाइन लोकमतधर्मशाळा, दि. १६ : न्यूझीलंडने दिलेल्या 191 या माफक आव्हानाचा भारतीय फलंदाजांनी सहज पाठलाग करत 6 गडी राखून चौतीसाव्या षटकातंच दणदणीत विजय मिळवला.  भारताकडून कोहलीने सर्वाधिक नाबाद 85 धावा फटकावल्या, तर रहाणेने 33 धावांचं योगदान दिलं. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

त्यापुर्वी उमेश यादव , हार्दिक पांड्या आणि केदार जाधवच्या धारधार आणि अचूक टप्याच्या गोलंदाजीपुढे न्युझीलंडचे फलंदाज अपयशी ठरले. भारतीय गोलंदाजाच्या अचूक  माऱ्यापुढे किवींची दाणादाण उडाली . न्यूझीलंडकडून लेथम व्यतीरिक्त एकाही किवी फलंदाजाला मैदानावर तग धरता आला नाही.  लेथमने एकाकी झूंज देत नाबाद 79 धावा फटकावल्या त्या जोरावर किंवींनी भारताला विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं होतं. 

 अनुभवी उमेश यादवने टेलर आणि न्युजीलंडचा कर्णधार केन विल्मस्नला माघारी पाठवले. यादवने ७ षटकात १७ धावा देताना २ फलंदाज बाद केले. तर पहिला एकदिवसीय सामना खेळणाऱ्या हार्दिकने राँची(०) तर धोकादायक टेलर आणि कोरी अँडरसनला बाद केले. पांड्याने ७ षटकात ३१ धावा खर्च करताना ३ फलंदाजाला बाद केले. कामचलावू फिरकी गोलंदाज केदार जाधवने उत्कृष्ट गोलंदाजी करताना २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याने ३ षटकात ६ धावा देताना २ फलंदाजाला बाद केले. टेलर (०), कर्णधार केन विल्यम्सन(३), गुप्टील(१२), कोरी अँडरसन(४) आणि राँन्की ० धावावर बाद झाला.  

कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध सुरू झालेल्या पाच सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिल्या सत्रात वर्चस्व राखले आहे. कसोटी मालिकेत नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीऐवजी वन डे मालिकेत महेंद्रसिंह धोनी याच्याकडे संघाची धुरा आहे. धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धर्मशाळा येथे सुरु असलेला हा सामना भारताचा ९०० वा वनडे सामना आहे. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील तिसरे स्थान मिळवण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध ४-१ असा विजय मिळवणे आवश्यक असल्यामुळे धोनीवरील दडपणात वाढ होणे स्वाभाविक आहे. सध्या न्यूझीलंड (११३ गुण) आणि भारत (११० गुण) चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा संघ भारतात कधीच एकदिवसीय मालिका जिंकू शकलेला नाही. मागील पाचही एकदिवसीय मालिकांमध्ये त्यांनी गमावल्या आहेत. या मालिका १९८८, १९९५, १९९९ व २०१० या वर्षी झाल्या होत्या.