शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारताची विजयी घोडदौड कायम

By admin | Updated: February 8, 2017 00:34 IST

यजमान भारताने अंधांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखताना न्यूझीलंड संघाचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला

भुवनेश्वर : यजमान भारताने अंधांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखताना न्यूझीलंड संघाचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला. अजयकुमार रेड्डीचे शानदार अर्धशतक भारताच्या विजयात लक्षवेधी ठरले.केआयआयटी मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडचा डाव भारतीयांनी ६ बाद १३६ धावांमध्ये रोखला. इक्बाल जाफर (२/१९) आणि केतन पटेल (१/१२) यांनी अचूक मारा करून न्यूझीलंडच्या फलंदाजांना जखडवून ठेवले. तसेच, बी. डी. विल्सन (५१ चेंडूत ५२ धावा) याने एकाकी झुंज दिल्याने न्यूझीलंडला समाधानकारक मजल मारण्यात यश आले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने केवळ ९ षटकांत एका फलंदाजाच्या मोबदल्यात १४० धावा फटकावल्या. अजयकुमार रेड्डीने केवळ २८ चेंडूंत १४ चौकारांसह नाबाद ७५ धावांचा तडाखा देत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसरीकडे, सुखराम माजीनेदेखील २५ चेंडूंत ११ चौकारांसह ५६ धावांची धमाकेदार खेळी करून भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. अन्य लढतीत, पाकिस्तानने दणदणीत विजयासह आगेकूच करताना बांगलादेशचा १५१ धावांनी पराभव केला. तसेच, वेस्ट इंडिजनेही विजयी कूच करताना डेनेल शिमच्या (१३१ धावा) चमकदार शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला ६५ धावांनी धक्का दिला. (वृत्तसंस्था)