विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या नजरा विदितवर
By admin | Updated: October 4, 2014 22:54 IST
पुणे:
विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या नजरा विदितवर
पुणे: आगामी विश्व ज्युनिअर बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये ग्रँडमास्टर विदित गुजरातीवर भारताच्या नजरा टिकून आहेत़ भारतासाठी तब्बल १६ वर्षांनंतर विश्व ज्युनिअरचा किताब देशात आणण्यासाठी गुजरातीला अधिक पसंती दिली जात आहे़ अभिजित गुप्ताने २००८ मध्ये विश्व ज्युनिअर किताब आपल्या नावे केला होता़ त्यानंतर विश्व ज्युनिअर किताब भारतात येऊ शकला नाही़ कारण गुजराती आणि ग्रँड मास्टर सहज ग्रोव्हर यांनी यानंतर अनुक्रमे २०१३ व २०११ मध्ये कांस्यपदक आपल्या नावे केले होते़ या प्रिमीयर चॅम्पियनशिपमध्ये २० वर्षांच्या आतील खेळाडूच भाग घेऊ शकतात़ यापूर्वी विश्वनाथन आनंदने १९८७ मध्ये आणि पी़ हिरकृष्णाने २००४ मध्ये विश्व ज्युनिअरचे किताब जिंकले होते़