शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

भारताची विजय पंचमी

By admin | Updated: March 11, 2015 00:47 IST

आॅस्ट्रेलियातील चार सामने जिंकून सुसाट सुटलेला धोनी सेनेचा वारु न्यूझीलंडमध्येही आपला झेंडा फटकावित आहे.

हॅमिल्टन : आॅस्ट्रेलियातील चार सामने जिंकून सुसाट सुटलेला धोनी सेनेचा वारु न्यूझीलंडमध्येही आपला झेंडा फटकावित आहे. भारताने मंगळवारी आयर्लंडचा ७९ चेंडू व ८ गडी राखून पराभव केला आणि आयसीसी क्रिकेट विश्वकप स्पर्धेत ‘ब’ गटात अव्वल स्थान पक्के केले. भारताचा या स्पर्धेतील हा सलग पाचवा विजय ठरला. फार्मात आलेल्या गोलंदाजीने आयर्लंडला २५९ च्या माफक धावांवर रोखून विजयाचा पाया रचला होता, त्यावर फलंदाजांनी कळस चढविण्याचे काम केले. सलामीवीर शिखर धवनने ८५ चेंडूत शतक झळकावित विजयात मोलाचा वाटा उचलला.विश्वचषक स्पर्धेतील भारताचा हा सलग नववा विजय आहे. आयर्लंड संघाचा पाच सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे, पण बाद फेरी गाठण्याच्या शर्यतीत हा संघ अद्याप कायम आहे. आयर्लंडचा कर्णधार विल्यम पोर्टरफिल्ड याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा ‘सेफ गेम’ खेळला. न्यूझीलंडच्या छोट्या मैदानावर भारताला प्रथम फलंदाजी दिली तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागू नये हा त्यामागचा विचार असावा. पण भारतीय गोलंदाजांनी आॅस्ट्रेलियातील कामगिरीचा आलेख न्यूझीलंडमध्येही उंचावताना आयर्लंडचा डाव ४९ षटकांत २५९ धावांत गुंडाळला. गोलंदाजांनी विजय आवाक्यात आणून ठेवल्यावर पुढील सोपस्कार फलंदाजांनी आरामात पूर्ण केले. विजयासाठी आवश्यक धावा ३६.५ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. स्टर्लिंग आणि पोर्टरफिल्ड या जोडीने आठव्या षटकात धावसंख्येचे अर्धशतक गाठले होते. या स्पर्धेत भारतीय गोलंदाजांना प्रथमच सुरुवातीच्या स्पेलमध्ये बळी मिळविण्यात अपयश आले, त्यामुळे चाहत्यांच्या मनात थोडी शंकेची पाल चुकचुकली. पण धोनीने खेळपट्टीचा स्वभाव ओळखला आणि नवव्या षटकापासून दोन्ही बाजूंनी फिरकीचा मारा सुरु केला. धोनीची ही मात्रा लगेच कामी आली. जलदगती गोलंदाजी आरामात खेळणारे न्यूझीलंडचे फलंदाज फिरकीपुढे चाचपडू लागले. रविचंद्रन अश्विनने आपल्या दुसऱ्याच षटकांत भारताला पहिले यश मिळवून दिले. फिरकीचा दबाव झुगारण्यासाठी अश्विनला पुढे येवून षटकार ठोकण्याचा प्रयत्न स्टर्लिंगच्या अंगलट आला आणि त्याने अजिंक्य रहाणेकडे झेल दिला. पोर्टरफिल्डला मग साथ देण्यास नील ओब्रायन आला. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असताना मोहीत शर्माने पोर्टरफिल्डचे काम तमाम केले. या विकेटसने भारताचा जीव भांड्यात पडला असे वाटत असताना नील ओब्रायन व अँडी बालबिर्नी (२४) यांनी पाचव्या विकेटसाठी ७.४ षटकांत ६१ धावांची भागीदारी केली, पण ही भागीदारी संपुष्टात आल्यानंतर आयर्लंडचा डाव गडगडला. भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत ६.३ षटकांत ३२ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. आयर्लंडतर्फे कर्णधार विलियम पोर्टरफिल्ड (६७) व नील ओब्रायन (७५) यांनी अर्धशतके झळकावली. रविचंद्रन अश्विनने ३८ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले तर मोहम्मद शमीने ४१ धावांत ३ फलंदाजांना माघारी परतवण्याची कामगिरी केली. उमेश यादव, मोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. अशा खेळपट्टीवर फलंदाजी कशी करावी याचे प्रात्यक्षिक भारतीय फलंदाजांनी आज आयरिश फलंदाजांना दिले. प्रत्युत्तरात खेळताना धवनने ८५ चेंडूंना सामोरे जात १०० धावांची खेळी केली. त्याने रोहित शर्मासोबत (६४) सलामीला १७४ धावांची भागीदारी करीत विजयाचा पाय रचला. त्यानंतर विराट कोहली (नाबाद ४४) आणि अजिंक्य रहाणे (नाबाद ३३) यांनी संघाला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. भारताने ३६.५ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. भारताला यानंतर १४ मार्च रोजी आॅकलंड येथे साखळीतील अखेरच्या सामन्यांत झिम्बाब्वेविरुद्ध खेळावे लागणार आहे. (वृत्तसंस्था)