शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे तीन खेळाडू सुवर्णपदकाच्या शर्यतीत, शशी, अंकुशिता यांचे वर्चस्व, नेहा यादवचे कांस्यवर समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 03:49 IST

गुवाहाटी : स्थानिक चाहत्यांचा भक्कम पाठिंबा लाभलेल्या भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीचा अडथळा सहज दूर सारताना येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

गुवाहाटी : स्थानिक चाहत्यांचा भक्कम पाठिंबा लाभलेल्या भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीचा अडथळा सहज दूर सारताना येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. कर्मवीर नवीनचंद्र बारडोलाय इन्डोअर स्टेडियममध्ये झालेल्या उपांत्य फेरीत भारतीयांनी वर्चस्व गाजविले. शशी चोप्रा आणि अंकुशिता बोरो आपापल्या प्रतिस्पर्धी बॉक्सरवर निर्विवाद गाजविले तर ज्योतीने गुणविभागणीेत सरशी साधली.ज्योतीने कझाकिस्तानची अबद्रायमोवा झांसाया हिचा ४-१ ने पराभव केला. शशीने मंगोलियाची मोंखोर नामूनवर आणि अंकुशिताने थायलंडच्या साकसिरी थंचानोकवर प्रत्येकी ५-० असा विजय मिळवला. थेट उपांत्य फेरीत स्थान मिळाल्यानंतर ८१ किलोवरील गटात नेहा यादव कझाकस्तानच्या दिना इस्लाम्बेकोवाकडून ०-५ ने पराभूत झाली. तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीतील भारताच्या उर्वरित तीन लढती शनिवारी होतील. सुवर्णपदकासाठी रविवारी सायंकाळी लढती होतील.फ्लायवेट प्रकारात (५१ किलो) ज्योतीने पहिल्या तीन मिनिटांत प्रतिस्पर्धी खेळाडूंवर पूर्र्णपणे वर्चस्व गाजविल्यानंतर दुसºया फेरीत मात्र बॅकफूटवर आली. तिसºया फेरीत दोघी जिद्दीने झुंजले. पण अखेर ज्योतीने ४-१ अशी सरशी साधली.‘ उपांत्य सामन्यात कडवे आव्हान मिळाले. तिसºया फेरीत मी स्वत:ला सावरले. अंतिम फेरीआधी एक दिवस आहे. चुकांवर तोडगा शोधून नव्या दमाने सुवर्ण पदक जिंकण्यासाठी सज्ज होणार असल्याचे विजयानंतर ज्योतीने सांगितले.

टॅग्स :boxingबॉक्सिंग