शहरं
Join us  
Trending Stories
1
"लगेच निवडणुका लागणार होत्या म्हणून..."; अपात्र 'लाडक्या बहिणीं'ना दिलेल्या पैशाबाबत अजित'दादां'चं मोठं विधान
2
सावधान...! पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना, मृतांचा आकडा 28 वर पोहोचला; सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळ
3
विश्वचषकात द्विशतक झळकावणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची अचानक निवृत्तीची घोषणा; कारण काय..?
4
'रामायण'मध्ये भोलेनाथचं दर्शन होणार, टीव्हीवरील 'हा' अभिनेता पुन्हा महादेवाच्या भूमिकेत दिसणार
5
एम एफ हुसेन यांची २५ चित्रे १७ वर्षांपासून बँकेच्या तिजोरीत धूळ खात पडून, आता होणार लिलाव
6
बांगलादेशच्या नोटांवरून हटवला शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो, आता देशाच्या चलनावर दिसणार मंदिरे! 
7
तुम्हाला माहित्येय? पब-रेस्टॉरंटसुद्धा चालवतो विराट कोहली! आता पोलिसांनी केली मोठी कारवाई; स्टार क्रिकेटर अडचणीत
8
'या' बँकेनं ग्राहकांना दिली गूड न्यूज; आता बचत खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्सचं टेन्शनच नाही, तुमचं अकाऊंट आहे का?
9
Astrology: पत्रिकेत विवाहाचा योगच नसेल तरी विवाह शक्य असतो का? सविस्तर जाणून घ्या!
10
बाजार 'लाल' रंगात न्हाला, पण अनिल अंबानींचे शेअर्स 'हिरवेगार'! असं काय घडलं की 'रॉकेट' झाले शेअर?
11
"दोन घटस्फोटांनंतर आता मला पार्टनरची...", आमिर खानने गर्लफ्रेंड गौरीबद्दल केलं भाष्य
12
Leela Hotels IPO ची सुस्त सुरुवात; लिस्टिंगनंतर शेअर्समध्ये मोठी तेजी
13
भारताशी पंगा घेणं पडतंय महागात! पाकिस्तानमध्ये पाण्यासाठी हाहाकार, पीक पेरणीवरही मोठा परिणाम 
14
"आईच्या अंत्यसंस्कारासाठी जायचं होतं पण पाकिस्तानने व्हिसा नाकारला.."; गायकाचा राग अनावर, काय घडलं होतं?
15
चार मुलांच्या आईचा ३० वर्षांचा बॉयफ्रेंड, लग्न करण्यासाठी सुनांचे दागिने घेऊन महिला झाली गायब!
16
सिक्कीममध्ये लष्करी छावणीवर भूस्खलन; 3 जणांचा मृत्यू, ९ सैनिक बेपत्ता
17
Health Tips: कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट पसरतोय, घाबरू नका पण 'या' तीन पद्धतीने घ्या काळजी!
18
टाटा सन्स 'या' व्यवसायांमध्ये ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार, कोणते आहेत बिझनेस, काय होणार फायदा?
19
सौदी अरेबियानं लाखो मुस्लिमांना मक्केबाहेरच रोखलं, नेमके काय घडलं? हज दरम्यानच का घेण्यात आला हा मोठा निर्णय? जाणून घ्या
20
दशकांपूर्वीची एक चूक जपानला महागात! भारताने टाकले मागे, जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी 'धोक्याची घंटा'!

भारताची आश्वासक सुरुवात

By admin | Updated: August 19, 2016 00:52 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखण्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या व अंतिम कसोटी सामन्यात विजय आवश्यक

पोर्ट आॅफ स्पेन : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखण्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या व अंतिम कसोटी सामन्यात विजय आवश्यक असलेल्या टीम इंडियाने पहिल्या दिवशी आश्वासक सुरुवात करताना यजमानांची २ बाद ६२ धावा अशी अवस्था केली. इशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक बळी घेताना विंडिजला सुरुवाती झटके दिले. दरम्यान, तिसऱ्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही पावसाने पहिल्याच दिवशी व्यत्यय आणल्याने २२ व्या षटकानंतर खेळ थांबविण्यात आला.क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर सुरु असलेल्य या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतरही चांगली सुरुवात केली. याआधी चार सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेल्या भारताला आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखण्यासाठी चौथ्या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे. त्यातच गोलंदाजांनी केलेल्या अचूक कामगिरीच्या जोरावर आक्रमक सुरुवात केलेल्या टीम इंडियाने आपला इरादा स्पष्ट केला. क्रेग ब्रेथवेट आणि लिआॅन जॉन्सन या सलामीवीरांनी सावध भूमिका घेत भारतीय गोलंदाजीचा आणि खेळपट्टीचा अंदाज घेतला. हे दोघे विंडिजला दमदार सुरुवात करुन देणार असे दिसत असतानाच इशांत शर्माने जॉन्सनला रोहित शर्माकरवी झेलबाद करुन भारताला पहिले यश मिळवून दिले. जॉन्सनने ३० चेंडूत एका चौकारासह केवळ ९ धावा केल्या. तर, यानंतर काहीवेळाने हुकमी गोलंदाज अश्विनने आपली जादू दाखवताना विंडिजचा प्रमुख फलंदाज डॅरेन ब्रावोला त्रिफळाचीत केले. त्याने १० चेंडूत २ चौकारांसह १० धावा काढल्या.पावसामुळे २२ व्या षटकात खेळ थांबविण्यात आला तेव्हा, ब्रेथवेट ७८ चेंडूत ५ चौकारांसह ३२ धावांवर खेळत होता. तर, अनुभवी मार्लेन सॅम्युअल्स त्याला चांगली साथ देत नाबाद ७ धावांवर टिकून आहे. (वृत्तसंस्था)धावफलक :वेस्ट इंडिज (पहिला डाव) : क्रेग ब्रेथवेट खेळत आहे ३२, लिआॅन जॉन्सन झे. रोहित गो. इशांत ९, डॅरेन ब्रावो त्रि. गो. अश्विन १०, मार्लेन सॅम्युअल्स खेळत आहे ४. अवांतर - ७. एकूण : २२ षटकात २ बाद ६२ धावा.गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ६-१-१३-०; मोहम्मद शमी ६-२-१४-०; इशांत शर्मा ५-३-७-१; रविचंद्रन अश्विन ५-१-२२-१.