शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

भारताची संथ सुरुवात, 27 षटकात 1 बाद 72 धावा

By admin | Updated: July 21, 2016 21:52 IST

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने यजमान वेस्ट इंडिजविरुध्द सावध सुरुवात करताना चहापाण्यापर्यंत 27 षटकात 1 बाद 72 धावा केल्या.

विंडिज कसोटी : मुरली विजय झटपट बाद

अ‍ॅण्टीग्वा : चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने यजमान वेस्ट इंडिजविरुध्द सावध सुरुवात करताना चहापाण्यापर्यंत 27 षटकात 1 बाद 72 धावा केल्या. सलामीवीर मुरली विजय याच्यारुपाने भारताला पहिला धक्का बसला.येथील सर विवियन रिचर्डस स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुरली विजय आणि शिखर धवन यांनी सावध भूमिका घेताना विंडिज गोलंदाजीचा आणि खेळपट्टीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. शॅनॉन गॅब्रीयल, कर्णधार जेसन होल्डर आणि कार्लोस ब्रेथवेट यांनी अचूक मारा करताना भारतीय फलंदाजांना जखडवण्यात यश मिळवले.

मात्र, गॅब्रीयल टाकत असलेल्या सातव्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर मुरली विजय ब्रेथवेटच्या हाती झेल देऊन परतला. विजय 26 चेंडूत एका चौकारासह केवळ 7 धावा काढून परतला. तर, धवनच्या सोबतीला आलेल्या चेतेश्वर पुजाराने दमदार बचाव करताना विंडिज गोलंदाजांना डोके वर काढण्याची संधी दिली नाही. शिखर धवन 74 चेंडूत चार चौकारासह 46 धावांवर खेळत असून पुजारा 63  चेंडूत 14 धावांवर खेळत आहे.