शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

भारताचा लाजिरवाणा पराभव

By admin | Updated: October 9, 2014 03:45 IST

वेस्ट इंडिजने उभ्या केलेल्या ३२१ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज अवघ्या १९७ धावांत ढेपाळले.

कोच्ची : वेस्ट इंडिजने उभ्या केलेल्या ३२१ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज अवघ्या १९७ धावांत ढेपाळले. पहिल्या वनडे सामन्यात गोलंदाजांपाठोपाठ फलंदाजांचे अपयश यजमानांसाठी डोकेदुखी ठरले. विंडीजने हा सामना १२४ धावांनी जिंकला. मार्लोन सॅम्युअल्स याच्या अष्टपैलू खेळाला या विजयाचे श्रेय जाते.आयपीएलमुळे भारतीय खेळपट्टीची अचूक जाण असलेल्या कॅरेबियन खेळाडूंनी यजमानांच्या गोलंदाजांची यथेच्च धुलाई केली. ड्वॅन स्मिथ (४६), मार्लोन सॅम्युअल्स (१२६*) आणि दिनेश रामदिन (६१) या त्रिकुटाने कोच्चीच्या नेहरू स्टेडियमवर कॅरेबियन वादळ निर्माण केले आणि भारतासमोर ३२१ धावांचे खडतर आव्हान उभे केले. सॅम्युअल्सने खास विंडिज स्टाईलची फटकेबाजी करून कारकिर्दीतले सहावे शतक पूर्ण केले. २०१५च्या वर्ल्डकप तयारीच्या दृष्टीने संघ बांधणीसाठी महत्त्वाच्या या मालिकेतील पहिल्याच लढतीत भारतीय संघाची हाराकिरी झाली. अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन या सलामीवीरांना ताळमेळ राखता न आल्याने आवघ्या ४९ धावांवर भारताला पहिला धक्का बसला. या धक्क्यातून सावरण्याआधीच विंडीजने यजमानांना हादरे देण्यास सुरुवात केली. भारताच्या सहा फलंदाजांना तर दुहेरी आकडा पार करू दिला नाही. ४ बाद ८३ धावा अशा दयनीय अवस्थेत असताना धवन आणि महेंद्रसिंग धोनी ही जोडी करिष्मा करेल अशी आशाही फोल ठरली. ३३ धावांवर धोनी आणि ६८ धावांवर धवन माघारी परतल्यानंतर पुन्हा गळती सुरू झाली. भारताचा संपूर्ण डाव ४१ षटकांत १९७ धावांवर गडगडला. (वृत्तसंस्था)