विश्वकपच्या पार्श्वभूमीवर भारताविरुद्धची मालिका महत्त्वपूर्ण : रामदीन
By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST
नवी दिल्ली:
विश्वकपच्या पार्श्वभूमीवर भारताविरुद्धची मालिका महत्त्वपूर्ण : रामदीन
नवी दिल्ली: आगामी 2015 आयसीसी विश्वकपच्या पार्श्वभूमीवर भारताविरुद्ध होणारी मालिका महत्त्वपूर्ण असून, या मालिकेत वेस्टइंडीज संघाकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा विंडीजचा कर्णधार दिनेश रामदीन याने व्यक्त केली आह़े विश्वकप खेळणार्या या दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण असणार्या या मालिकेतील कामगिरीच्या जोरावरच खेळाडूंना विश्वकप संघात स्थान मिळणार आह़े माझ्या मते या मालिकेसाठी आमच्याकडे 80 ते 85 टक्के दज्रेदार खेळाडू आहेत़ भारताविरुद्ध चांगल्या कामगिरीची गरज आह़े