शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे उपांत्य फेरीचे लक्ष्य

By admin | Updated: July 5, 2017 01:55 IST

सलग तीन लढतींमध्ये विजय मिळविल्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असून, आज (बुधवारी) आयसीसी महिला

डर्बी : सलग तीन लढतींमध्ये विजय मिळविल्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असून, आज (बुधवारी) आयसीसी महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेत त्यांना श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय संघ या लढतीत विजय मिळवित उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच करण्यास उत्सुक आहे. फॉर्मात असलेल्या भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत प्रबळ दावेदार मानले जात आहे. श्रीलंका संघाची आतापर्यंतची स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक ठरली आहे. त्यांना तीनही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. फॉर्मचा विचार करता भारताने गेल्या चारही वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिका जिंकलेल्या आहेत. भारतीय संघाने या वाटचालीमध्ये मायदेशात श्रीलंका व विंडीजचा व्हाइटवॉश केला, तर दक्षिण आफ्रिकेला विश्वकप पात्रता स्पर्धा व चौरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत पराभवाचा तडाखा दिला. विश्वकप स्पर्धेत भारताने तिन्ही राऊंड रॉबिन लढतींमध्ये विजय मिळवला. भारतीय संघ कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. भारताने सलामी लढतीत यजमान इंग्लंडचा ३५ धावांनी पराभव करीत शानदार सुरुवात केली. त्यानतंर दुसऱ्या लढतीत विंडीजचा ७ गडी राखून पराभव केला. पाकिस्तानविरुद्ध गेल्या लढतीत ९५ धावांनी विजय मिळवला. सलग तीन विजयांमुळे भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. भारतीय संघाने तीन सामन्यांत सहा गुणांची कमाई केली असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पहिल्या दोन सामन्यांत फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध गेल्या लढतीत डावखुरी फिरकीपटू एकता बिष्टने १० षटकांत १८ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेत, प्रतिस्पर्धी संघाचा डाव ३८.१ षटकांत ७४ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मधल्या षटकांमध्ये दीप्ती शर्माने अचूक मारा केला. पूनम यादव व हरमनप्रीत कौर यांचीही गोलंदाजी उल्लेखनीय ठरली. वन-डे इतिहासात आतापर्यंत सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरलेल्या झुलन गोस्वामीला अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही, पण पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजी आक्रमणाचा भार तिच्याच खांद्यावर राहणार आहे. फलंदाजीमध्ये सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना शानदार फॉर्मात आहे. कर्णधार मिताली राज व पूनम राऊत यांचीही कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता श्रीलंका संघ विजयाचे खाते उघडण्याची प्रतीक्षा करीत आहे. श्रीलंकेला सलामी लढतीत न्यूझीलंडविरुद्ध ९ गड्यांनी, आॅस्ट्रेलियाविरुद्ध ८ गड्यांनी आणि इंग्लंडविरुद्ध ७ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. श्रीलंका संघाला फलंदाजीमध्ये सर्वाधिक आशा चामरी अटापट्टूकडून आहे. तिने न्यूझीलंडविरुद्ध ५३ तर आॅस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १७८ धावांची खेळी केली होती. पण संघाला विजय मिळवून देण्यात तिचे प्रयत्न अपुरेच पडले. (वृत्तसंस्था)प्रतिस्पर्धी संघभारत :- मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, एकता बिष्ट, सुषमा वर्मा, मानसी जोशी, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि नुजहत प्रवीण. श्रीलंका :- इनोका रानावीरा (कर्णधार), चामरी अटापट्टू, चंदिमा गुणारत्ने, निपुनी हंसिका, अमा कंचना, ईशानी लोकुसूर्या, हर्षिता माधवी, दिलानी मनोदरा, हासिनी परेरा, चामरी पोलगमपाला, उदेशिका प्रबोधिनी, ओशादी रानासिंघे, शशिकला श्रीवर्देना, प्रसादिनी वीराकोडी आणि श्रीपाली वीराकोडी.