शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

भारताचा दुसरा विजय

By admin | Updated: January 10, 2016 04:40 IST

भारताने टी-२० सराव सामन्यात विजय मिळवल्यावर शनिवारी झालेल्या एकदिवसीय सराव सामन्यातही पश्चिम आॅस्ट्रेलियावर ६४ धावांनी विजय मिळवला.

पर्थ : भारताने टी-२० सराव सामन्यात विजय मिळवल्यावर शनिवारी झालेल्या एकदिवसीय सराव सामन्यातही पश्चिम आॅस्ट्रेलियावर ६४ धावांनी विजय मिळवला. २४९ धावसंख्येचा पाठलाग करताना पश्चिम आॅस्ट्रेलियाचा संघ १८५ धावांत बाद झाला.भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्यात भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. टी-२०मध्ये कमाल दाखवणारा शिखर धवन ४ तर विराट कोहली ७ धावांवर तंबूत परतले. पॉर्टरने या दोन्ही फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी संयमी खेळी केली. रोहितने ६ चौकार आणि तीन षटकांर ठोकत ६७ धावांची खेळी केली. तर रहाणेने ४१ धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. राहणे बाद झाल्यानंतर सामन्यात पाच बळी घेण्याची कामगिरी करणारा पश्चिम आॅस्ट्रेलियाचा पॉर्टरनेच गुरकिरतला बाद केले. ५८ धावांची खेळी करणारा मनीष पांडेला मुडीने तंबूत परत पाठवले. अष्टपैलू रवींद्र जडेजाने २६ धावांची उपयुक्त खेळी केली. भारताचा संघ २४९ धावांवर सर्वबाद झाला.पश्चिम आॅस्ट्रेलियाचा संघ १८५ धावांत सर्वबाद झाला. मात्र जेक कार्डर (४५) आणि जेरॉन मॉर्गन (५०) यांनी भारतीय गोलंदाजांना चांगलेच सतावले. जडेजाने कार्डरचा तर ऋषी धवनने मॉर्गनचा अडसर दूर केला. पश्चिम आॅस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. ४९.२ षटकांत १८५ धावा करून हा संघ तंबूत परतला.(वृत्तसंस्था)धावफलक : भारत २४९ सर्वबाद : रोहित शर्मा झे. शॉर्ट गो. मुईरहेड ६७, शिखर धवन झे.मुईरहेड गो.पॉर्टर ४, विराट कोहली पायचित पॉर्टर ७, अजिंक्य रहाणे गो. मुईरहेड ४१, गुरकिरतसिंग झे.इंग्लिस गो.पॉर्टर ६, मनीष पांडे झे.कॉर्डर गो.मुडी ५८, महेंद्रसिंह धोनी बाद इंग्लिस गो. ओ. कॉर्नर १५, रवींद्र जडेजा झे. कॉर्डर गो. पॉर्टर २६, अक्षर पटेल नाबाद ८, ऋषी धवन धावबाद (मुडी) ०, आर. आश्विन झे. इंग्लिस गो. पॉर्टर ४ अवांतर १३. गोलंदाजी : डेव्हिड मुडी ६-१-२४-१, ओ कॉर्नर ६-०-३७-१, जेम्स मुईरहेड १०-०-५५-२, ड्र्यु पॉर्टर ९.१-०-३७-५, टर्नर ५-०-३३-०पश्चिम आॅस्ट्रेलिया एकादश : १८५ सर्वबाद: विल्यम बोसिस्टो झे. धोनी गो. यादव १३, जेक कॉर्डर पायचित आश्विन ४५, डी आरकी शार्ट गो. आश्विन १०, निक होबस्टन झे. धोनी गो.ऋषी धवन ४, जोश इंग्लिस गो. पटेल १७, ड्र्यु पॉर्टर झे. धोनी गो. आश्विन १०, जेरॉन मॉर्गन झे. रोहित गो. धवन ५०, जेम्स मुईरहेड झे. गुरकिरत सिंग गो. जडेजा ११, डेव्हिड मुडी झे. गो. पटेल २७, मार्क टर्नर नाबाद २, लियाम ओ’ कॉर्नर झे. यादव गो. गुरकिरत सिंग ०. (अवांतर : १५) गोलंदाजी : उमेश यादव ७-०-२९-१,बरिंदर शरण ७-१-२२-०, ऋषी धवन ७-१-२८-२, रवींद्र जडेजा १०-०-३८-२, आर. आश्विन १०-१-३२-२, अक्षर पटेल ८-०-२९-२, गुरकिरत सिंग ०.२-०-१-१