शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

डकार २०२६ साठी भारताचा निर्धार; संजय टकले पुन्हा एकदा जागतिक आव्हानासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:48 IST

ते मोजक्या भारतीय चालकांपैकी एक

India's Sanjay Takale prepares for Dakar Rally 2026 :  जगातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित रॅली-रेड स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डकार रॅलीत भारत पुन्हा एकदा झेंडा फडकावण्यास सज्ज झाला आहे. अनुभवी मोटरस्पोर्ट खेळाडू आणि एरपेस रेसर संजय टकले डकार रॅली २०२६  मध्ये दुसऱ्यांदा सहभाग नोंदवणार असून, भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

ते मोजक्या भारतीय चालकांपैकी एक

अत्यंत प्रतिकूल हवामान, दीर्घ पल्ल्याचे टप्पे आणि यांत्रिक तसेच मानसिक कसोटी यांसाठी प्रसिद्ध असलेली डकार रॅली ही मानव आणि यंत्र यांची अंतिम परीक्षा मानली जाते. या कठीण स्पर्धेत संजय टकले यांचा सहभाग भारतासाठी अभिमानास्पद मानला जात आहे. आंतरराष्ट्रीय रॅली क्षेत्रातील त्यांचा अनुभव, शिस्तबद्ध तयारी आणि सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे ते डकारमध्ये सहभागी होणाऱ्या मोजक्या भारतीय चालकांपैकी एक ठरले आहेत.

अनुभवाची शिदोरीसोबत असल्यामुळे यंदाची स्पर्धा ठरेल खास

मागील डकार स्पर्धेत संजय टकले यांनी एकूण १८ वे स्थान पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली होती. ही कामगिरी जागतिक मोटरस्पोर्ट क्षेत्रात भारतासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. यंदाच्या डकार मोहिमेला टकले “डकार २.०” असे संबोधतात. ज्यात अधिक सखोल नियोजन, अनुभवातून मिळालेली शहाणपणाची जोड आणि नव्या उद्दिष्टांचा स्पष्ट आराखडा आहे. मोटरसायकल रेसिंगपासून कार रॅली आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंतचा ३५ वर्षांहून अधिक प्रदीर्घ प्रवास संजय टकले यांना डकार २०२६ स्पर्धेसाठी  अधिक सक्षम बनवत आहे. तांत्रिक समज, मानसिक तयारी आणि अनुभवाची शिदोरी यामुळे ते यंदा अधिक आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरतील.

फ्रान्सच्या कंपेन शारन कडून तांत्रिक सहाय्य

आपला अनुभव सांगताना संजय टकले म्हणाले, “माझी पहिली डकार ही एक विलक्षण अनुभूती होती. डकार तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकते. एकदा ती रेस केल्यानंतर तुम्ही कधीच पूर्वीसारखे राहत नाही. ती मानसिकदृष्ट्या आव्हान देते, तुम्हाला खचवते आणि मग पुन्हा उभं राहण्याची, शिस्तीची आणि खऱ्या अर्थाने लढण्याची शिकवण देते. मी केवळ अधिक मजबूत ड्रायव्हर म्हणूनच नव्हे, तर एक वेगळा माणूस म्हणून परतलो. यंदा माझे उद्दिष्ट स्पष्ट आहे. डकार पुन्हा पूर्ण करणे आणि माझी कामगिरी लक्षणीयरीत्या सुधारणे. मी पुन्हा एकदा माझ्या एरपेस रेसर्स संघासाठी स्पर्धा करणार असून, फ्रान्सच्या कंपेन शारन कडून तांत्रिक सहाय्य मिळणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी भारताकडून एकमेव फोर-व्हीलर एन्ट्री असल्याचा मला अभिमान आहे. माझे ध्येय फिनिश लाईन गाठणे आणि अधिक मजबूतपणे स्पर्धा पूर्ण करणे हेच आहे.”

ही फक्त स्पर्धा नव्हे तर एरपेसच्या कार्यपद्धतीचे मूलभूत तत्त्व

स्पर्धात्मक रेसिंगबरोबरच संजय टकले हे एरपेस इंडस्ट्रीजचे संचालक म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या मते, मोटरस्पोर्ट हे अचूक नियोजन, सहनशक्ती, प्रणालीगत विचार आणि शिस्तबद्ध अंमलबजावणी यांचे जिवंत उदाहरण आहे. जे एरपेसच्या कार्यपद्धतीचेही मूलभूत तत्त्व आहे. डकार रॅली २०२६ जवळ येत असताना, संजय टकले यांची ही मोहीम केवळ एक स्पर्धा न राहता, जागतिक मोटरस्पोर्ट क्षेत्रात भारताची वाढती ताकद, जिद्द आणि क्षमतेचे प्रतीक म्हणून पाहिली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Takale aims for Dakar 2026, representing India again.

Web Summary : Sanjay Takale prepares for Dakar 2026, aiming to improve his previous performance. Representing India, he emphasizes meticulous planning and experience. With technical support from France's Compain Charyenn, Takale sees the rally as a test of endurance and discipline, mirroring the values of his company, Erpace Industries. He is determined to reach the finish line stronger.