शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

भारताचा फ्रान्सला धक्का

By admin | Updated: June 21, 2015 01:09 IST

मनप्रीतसिंग, देवेंद्र वाल्मीकी आणि रमणदीप सिंगने नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलने भारतीय हॉकी संघाने वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरीच्या सामन्यात बलाढ्य फ्रान्स संघाला ३-२ गोलने पराभूत केले.

एंटवर्प : मनप्रीतसिंग, देवेंद्र वाल्मीकी आणि रमणदीप सिंगने नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलने भारतीय हॉकी संघाने वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरीच्या सामन्यात बलाढ्य फ्रान्स संघाला ३-२ गोलने पराभूत केले. केएचसी ड्रॅगॉन्स स्टेडियमवर झालेल्या चुरशीच्या लढतीत फ्रान्सच्या आॅलिव्हर सॅन्चेसने तिसऱ्याच मिनिटाला गोल करून आशियाई चॅम्पियन भारतीय संघावर दडपण आणले. त्यानंतर भारताच्या मनप्रीतसिंगने २६व्या मिनिटाला आणि लगेचच ३ मिनिटाच्या अंतराने देवेंद्र वाल्मीकीने नोंदविलेल्या लागोपाठ २ गोलमुळे भारताला २-१ आघाडी मिळाली. सामन्याच्या २२व्या मिनिटाला फ्रान्स खेळाडूंना गोल करण्याची संधी मिळाली होती. पण त्यांच्या बे्रसेसला त्या संधीचा फायदा घेता आला नाही. त्यानंतर सॅन्चेसलासुद्धा गोल करण्याची संधी मिळाली होती. परंतु भारताच्या श्रीजेसने त्याने मारलेला चेंडू चपळाईने अडवला.४३ व्या मिनिटाला फ्रान्सच्या सिमन्स मार्टिन ब्रिसेसने गोल करून बरोबरी साधली. ही बरोबरी खूप वेळ अबाधित होती. ही लढत बरोबरीत संपणार असे दोन्ही संघांच्या पाठीराख्यांना वाटत होते. भारतीय संघाची आघाडीची फळी ही बरोबरी तोडून काढण्याचा प्रयत्न जोरदार करत होती. ५८व्या मिनिटाला कर्णधार सरदारासिंगच्या ताब्यात चेंडू असताना त्याने रिव्हर्सहीट फ्रान्सच्या सर्कलमध्ये मारला. तेथे उभ्या असलेल्या आकाशदीप सिंगने कोणतीही चूक न करता चेंडू अडवीत समोर उभ्या असलेल्या रमणदीपकडे पास केला. रमणदीपने कोणतीही चूक न करता चेंडू फ्रान्सच्या गोलमध्ये टाकून भारताला ३-२ आघाडी मिळवून दिली. अखेरच्या काही मिनिटात फ्रान्सने अपयशी प्रयत्न केले.