शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघाचा दारुण पराभव

By admin | Updated: July 9, 2017 02:59 IST

सलामीवीर लिझेल ली हिने झळकावलेले आक्रमक अर्धशतक आणि कर्णधार डेन वॉन नीकर्क हिची शानदार अष्टपैलू खेळी या जोरावर दक्षिण आफ्रिकेने महिला क्रिकेट

लिसेस्टर : सलामीवीर लिझेल ली हिने झळकावलेले आक्रमक अर्धशतक आणि कर्णधार डेन वॉन नीकर्क हिची शानदार अष्टपैलू खेळी या जोरावर दक्षिण आफ्रिकेने महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत फॉर्ममध्ये असलेल्या भारताचा ११५ धावांनी धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २७३ धावा उभारल्यानंतर भारतीय संघाचा केवळ १५८ धावांमध्ये डाव गुंडाळत आफ्रिकेने मोठा विजय मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. स्मृती मानधना (४) झटपट परतल्यानंतर पूनम राऊत - दीप्ती शर्मा यांनी ४३ धावांची भागीदारी करून भारताला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, पूनम २२ धावा काढून परतल्यानंतर भारताच्या डावाला गळती लागली. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा काढून विश्वविक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर असलेली कर्णधार मिताली राज भोपळाही न फोडता बाद झाली. त्यानंतर लगेच हरमनप्रीत कौरही शून्यावर बाद झाली. वेदा कृष्णमूर्ती (३), शिखा पांड्ये (०) आणि सुषमा वर्मा (०) केवळ हजेरी लावून परतल्याने भारताची ७ बाद ६५ धावा अशी केविलवाणी अवस्था झाली. येथेच संघाचा पराभव निश्चित झाला होता. यानंतर, पुढच्या ९३ धावांमध्ये भारताचा डाव गुंडाळून आफ्रिकेने बाजी मारली. दरम्यान, दीप्ती शर्माने एकाकी झुंज देताना १११ चेंडंूत ५ चौकारांसह ६० धावा केल्या. झूलन गोस्वामीने ८८ चेंडूत नाबाद ४३ धावा केल्या. आफ्रिकेची कर्णधार नीकर्कने २२ धावांत ४ बळी घेत भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडले. तत्पूर्वी, सलामीवीर लिझेल ली आणि नीकर्क यांच्या अर्धशतकी तडाख्याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आव्हानात्मक मजल मारली. लीने ६५ चेंडूंत १० चौकार व ७ षटकारांचा पाऊस पाडताना ९२ धावांचा चोप दिला. मधल्या फळीत नीकर्कने मोक्याच्या वेळी अर्धशतक झळकावताना ६६ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ५७ धावा केल्या. तसेच, इतर फलंदाजांनीही छोटेखानी परंतु महत्त्वपूर्ण फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोलाचे योगदान दिले. गोलंदाजीमध्ये शिखा पांड्ये ३, तर एकता बिष्ट आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. परंतु, इतर गोलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने आणि धावांची खैरात केल्याने आफ्रिकेने मोठी धावसंख्या उभारली. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक दक्षिण आफ्रिका : ५० षटकांत ९ बाद २७३ धावा (लिझेल ली ९२, डेन वॅन नीकर्क ५७; शिखा पांड्ये ३/४०, हरमनप्रीत कौर २/१८, एकता बिष्ट २/६८) वि. वि. भारत : ४६ षटकांत सर्व बाद १५८ धावा (दीप्ती शर्मा ६०, झूलन गोस्वामी नाबाद ४३; वॅन नीकर्क ४/२२).