वन-डे मालिका : श्रीलंकेविरुद्ध तिसरी लढत आज
हैदराबाद : पहिल्या दोन सामन्यांत सरशी साधणा:या यजमान भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्ध रविवारी खेळल्या जाणा:या तिस:या लढतीत मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा निर्धार आहे.
कोहली अॅण्ड कंपनीने आतार्पयत चाहत्यांना नियमित कर्णधार महेंद्रसिंह धोनीची उणीव भासू दिलेली नाही. धोनीला पहिल्या तीन वन-डे सामन्यांसाठी विश्रंती देण्यात
आलेली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली.
कटकमध्ये सलामीवीर अजिंक्य रहाणो व शिखर धवन यांनी चमकदार कामगिरी केली, तर मोटेरामध्ये अंबाती रायुडूने शतक झळकाविले. भारताने पहिल्या लढतीत 169 धावांनी, तर मोटेरामध्ये 275 धावांचे लक्ष्य पाच षटके शिल्लक राखून पूर्ण केले. या मालिकेत शतक झळकाविणारे
रहाणो, धवन व रायुडू यांना रोखण्यात श्रीलंकन गोलंदाज सपशेल अपयशी ठरले.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल ठरण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, येथे 3क्क् पेक्षा अधिक धावा फटकाविल्या जाण्याची शक्यता आहे. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दोन्ही सामन्यांत चांगली कामगिरी केली. पहिल्या लढतीत ईशांत शर्माने चार बळी
घेतले, तर दुस:या लढतीमध्ये फिरकीपटू आर. अश्विन आणि
अक्षर पटेल यांनी वर्चस्व गाजविले. युवा अक्षर पटेलने दुस:या वन-डे सामन्यात 1क् षटकांत 39 धावांच्या मोबदल्यात 2 बळी घेतले. त्यामुळे कोहली तिस:या लढतीसाठी संघात विशेष बदल करणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
यजमान संघ श्रीलंका संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी श्रीलंका संघापुढे या लढतीत विजय मिळविण्याचे आव्हान आहे. त्यामुळे रविवारी खेळल्या जाणा:या लढतीत श्रीलंका संघ सरस कामगिरी करण्यास प्रयत्नशील आहे. अॅन्जेलो मॅथ्यूजच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघाने अहमदाबादमध्ये आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. निराशाजनक सुरुवातीनंतर मॅथ्यूज (नाबाद 92) आणि अनुभवी कुमार संगकारा (61) यांनी झळकाविलेल्या अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंका संघाने भारतीय संघापुढे आव्हानात्मक धावसंख्येचे लक्ष्य ठेवले होते.
संगकारा आणि थिसारा परेरा यांच्यासाठी एकप्रकारे हे गृहमैदान आहे. हे दोन्ही खेळाडू आयपीएल स्पर्धेत सनरायजर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करतात. गोलंदाजांचे अपयश श्रीलंका संघासाठी चिंतेचा विषय आहे. धम्मिका प्रसाद, परेरा आणि सूरज रणदीव यांना अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी
करता आलेली नाही.
ऑफ स्पिनर रणदीवने पहिल्या लढतीत तीन बळी घेतले होते, तर लेग
स्पिनर सीकुगे प्रसन्नाने अहमदाबादमध्ये तीन बळी घेतले, पण धावांचा
विचार करता हे दोन्ही गोलंदाज
महागडे ठरले. (वृत्तसंस्था)
प्रत्येक लढतीत आक्रमकता कायम राखण्यास उत्सुक : कोहली
भारतीय संघ 2क्15 च्या विश्वकप स्पर्धेर्पयत प्रत्येक लढतीत आक्रमकता कायम राखण्यास प्रयत्नशील आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळविणारा भारतीय संघ विजयाची हॅट्ट्रिक नोंदवीत मालिका विजयासाठी उत्सुक आहे, असेही कोहलीने सांगितले.
तिस:या वन-डेच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना कोहली म्हणाला, की प्रत्येक लढत आव्हानात्मक असते. आम्ही प्रत्येक सामना ‘नॉकआऊट’ लढतीप्रमाणो खेळतो. त्यामुळे मालिकेत 2-क् ने आघाडी मिळविली असली, तरी त्याचा विचार करीत नाही. आम्ही प्रत्येक सामन्यासाठी रणनीती तयार करतो आणि त्याप्रमाणो खेळ करण्यासाठी प्रयत्नशील असतो.
विश्वकप स्पर्धेपूर्वी याप्रमाणो मानसिकता राखणो गरजेचे आहे. विश्वकप स्पर्धेत बाद फेरीत एक लढत गमाविली, तरी स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागतो.
कोहली पुढे म्हणाला, की प्रतिस्पर्धी संघाची बलस्थाने व कमकुवत बाजू
याचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणो महत्त्वाचे आहे.
आम्ही जर चांगली कामगिरी केली, तर प्रतिस्पर्धी संघाच्या कामगिरीचा विचार करण्याची गरज नाही. आम्ही यावरच लक्ष केंद्रित केले आहे. मिशन वर्ल्डकपला प्रारंभ झाला आहे. आम्हाला आता प्रत्येक लढतीत विजय मिळवावा लागेल आणि प्रत्येक खेळाडू त्यासाठी प्रयत्नशील आहे.
आम्ही जर चांगली कामगिरी केली, तर प्रतिस्पर्धी संघाच्या कामगिरीचा विचार करण्याची गरज नाही. आम्ही यावरच लक्ष केंद्रित केले आहे. मिशन वर्ल्डकपला प्रारंभ झाला आहे. आम्हाला आता प्रत्येक लढतीत विजय मिळवावा लागेल आणि प्रत्येक खेळाडू त्यासाठी प्रयत्नशील आहे.
आतार्पयतचा दौरा खडतर : रोजर
भारताचा आतार्पयतचा दौरा आमच्या संघासाठी खडतर ठरला, अशी कबुली श्रीलंका संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक रोजर विजयसुरिया यांनी दिली. रविवारी खेळल्या जाणा:या तिस:या वन-डे लढतीच्या पूर्वसंध्येला बोलताना विजयसुरिया म्हणाले, ‘आम्ही सध्या मालिकेत 2-क्ने पिछाडीवर आहोत.
आमच्यासाठी हा दौरा आतार्पयत खडतर ठरला आहे. आम्हाला पहिल्या दोन्ही सामन्यांतून बरेच काही शिकायला मिळाले. मालिकेत यानंतर खेळल्या जाणा:या लढतींसाठी खेळाडू तयार आहेत, पण युवा खेळाडूंपुढे चांगली कामगिरी करण्याचे आव्हान आहे.
युवा खेळाडूंना क्षमता सिद्ध करण्याची चांगली संघी आहे.’ भारतीय फलंदाजांनी पहिल्या दोन्ही सामन्यांत चमकदार कामगिरी केली. फिरकीपटू सूरज रणदीव व सीकुगे प्रसन्ना महागडे गोलंदाज ठरले आहेत. श्रीलंका संघातर्फे चार कसोटी व आठ वन-डे सामन्यांत प्रतिनिधित्व करणा:या फिरकी प्रशिक्षकांनी खेळाडूंची पाठराखण केली. रोजर म्हणाले, ‘सूरज प्रदीर्घ कालावधीनंतर सिनिअर संघात खेळत आहे. तो श्रीलंकेमध्ये खेळत होता.
पण येथील परिस्थितीसोबत जुळवून घेण्यास वेळ अपेक्षित आहे.
4भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणो, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रिद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, धवल कुलकर्णी, उमेश यादव, ईशांत शर्मा, अमित मिश्र, मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल.
4श्रीलंका : अॅन्जेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, तिलकरत्ने दिलशान, उपुल थरंगा, कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, अशान प्रियंजन, निरोशन डिकवेला, थिसारा परेरा, नुवान कुलसेकरा, धम्मिका प्रसाद, लाहिरू गामेगे, चतुरंगा डिसिल्वा, सीकुगे प्रसन्ना, सूरज रणदीव.