शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

भारताचा दारुण पराभव

By admin | Updated: November 21, 2014 01:52 IST

थायलंडविरुद्ध निसटता विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला गुरुवारी आशियाई बीच गेम्स स्पर्धेत इराणकडून पराभव पत्करावा लागला.

फुकेट : थायलंडविरुद्ध निसटता विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला गुरुवारी आशियाई बीच गेम्स स्पर्धेत इराणकडून पराभव पत्करावा लागला. इराणने ४०-३१ अशा फरकाने भारताला नमवले. २०१२च्या आशियाई बीच स्पर्धेत इराणने ४२-३२ अशा फरकाने नमवत भारताला कांस्यपदकावर समाधान मानण्यास भाग पाडले होते. गतविजेत्यांनी त्याच लढतीची पुनरावृत्ती गुरुवारी करून जेतेपदाच्या दिशेने आगेकूच केली आहे. कर्णधार राहुल चौधरीने इराणच्या खेळाडूंना सडेतोड उत्तर देत पहिल्या हाफपर्यंत सामना १८-१६ असा अटीतटीचा ठेवला. दुसऱ्या हाफमध्ये मात्र इराणने रणनीती बदलली आणि मेरज शेख व हादी ओश्तोराक यांच्या दमदार चढायांच्या बळावर आघाडी घेतली. अमिऱ्होसेन मोहम्मद मइकी याची पकड करण्यात भारतीय खेळाडूंना अपयश आल्याने त्याचा मोठा फटका सहन करावा लागला. त्यामुळे इराणने दुसऱ्या हाफमध्ये २२ गुणांची कमाई करीत सामना आपल्या बाजूने झुकवला. भारताला दुसऱ्या हाफमध्ये केवळ १५ गुणांची कमाई करण्यात यश मिळाले. इराणकडून पराभव झाल्यामुळे भारताला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी बांगलादेशवर विजय मिळवणे गरजेचे झाले आहे. (वृत्तसंस्था)