शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

थॉमस, उबेर कपमध्ये भारताची निराशाजनक सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 02:34 IST

भारताच्या बाद फेरी गाठण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आहे.

बँकॉक : भारताला पुरुष व महिला विभागात युवा खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे रविवारी थॉमस व उबेर कप बॅडमिंटनमध्ये अनुक्रमे फ्रान्स व कॅनडाविरुद्ध १-४ अशा समान फरकाने पराभव स्वीकारावा लागला.त्यामुळे भारताच्या बाद फेरी गाठण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आहे. भारतीय पुरुष संघाला जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावरील एच. एस. प्रणय आणि मनू अत्री व बी. सुमीत रेड्डी न खेळण्याचा फटका बसला. भारताच्या युवा व अनुभवहीन संघाचा फ्रान्सच्या कमी मानांकन असलेल्या खेळाडूंविरुद्ध टिकाव लागला नाही. जागतिक क्रमवारीत १८ व्या क्रमांकावर असलेल्या बी. साई प्रणीतने ब्राईस लेवरडेजचा २१-७, २१-१८ ने पराभव करीत भारताला सकारात्मक सुरुवात करून दिली; पण अन्य खेळाडूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दिवसाच्या दुसऱ्या लढतीत जागतिक क्रमवारीत ३८ व्या स्थानावर असलेल्या एम. आर. अर्जुनव रामचंद्र श्लोक यांना पुरुष दुहेरीमध्ये दडपण झुगारता आले नाही. त्यांना बास्टियान कारसौडी व ज्युलियन माइयो या जागतिक क्रमवारीतील ४७ व्या क्रमांकावरील जोडीविरुद्ध १३-२१, १६-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.स्वीस ओपन चॅम्पियन समीर वर्मावर त्यानंतर भारताला पुनरागमन करून देण्याची जबाबदारी होती; पण जागतिक क्रमवारीत २१ व्या स्थानावर असलेला हा खेळाडू एकेरीच्या दुसºया लढतीत ४३ व्या स्थानावर असलेल्या लुकास कोर्वीविरुद्ध संघर्षपूर्ण लढतीत १८-२१, २२-२०, १८-२१ ने पराभूत झाला.दुहेरीच्या दुसºया लढतीत अरुण जॉर्ज व संयम शुक्ला या ७० व्या मानांकित जोडीला क्रमवारीत १०३ व्या स्थानावर असलेल्या थोम गिक्वेल व रोहन लाबेर यांच्याकडून केवळ २८ मिनिटांमध्ये १०-२१, १२-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. लक्ष्य सेनने त्यानंतर काही वेळ संघर्ष केला; पण त्यालाही एकेरीच्या तिसºया लढतीत टोमा ज्युनिअर पोपोव्हविरुद्ध २०-२२, २१-१९, १९-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. भारताला यानंतर सोमवारी पुढच्या लढतीत आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला समोरे जावे लागणार आहे.उबेर कप स्पर्धेत भारतीय संघ आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू व राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेती जोडी अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी यांच्याविना सहभागी झाला. भारताची भिस्त सायना नेहवालवर अवलंबून होती; पण यापूर्वी दोनदा कांस्यपदक जिंकणाºया भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही.मेघना, पूर्विशाने केल्या आशा पल्लवीत...1राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सायनाला पहिल्या लढतीत कॅनडाच्या मिशेली लीविरुद्ध पहिला गेम जिंकल्यानंतरही २१-१५, १६-२१, १६-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. युवा वैष्णवी जक्का रेड्डीचा कॅनडाच्या राचेल होंड्रिचविरुद्ध निभाव लागला नाही. तिला ११-२१, १३-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.2दुहेरीमध्ये मेघना जकामपुडी व पूर्विशा एस. राम या ४१ व्या मानांकन असलेल्या जोडीने मिशेल टोंग व जोसफाईन वू यांचा २७ मिनिटांमध्ये २१-१९, २१-१५ ने पराभव करीत भारताच्या आशा पल्लवीत केल्या; पण कृष्णा प्रिया कुद्रावल्ली हिला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. तिला ब्रिटनी टॅमविरुद्ध ११-२१, १५-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.3कॅनडाने या विजयासह ३-१ ने विजयी आघाडी घेतली होती. आता अखेरची लढत केवळ औपचारिक होती. त्यात संयोगिता घोरपडे व प्राजक्ता सावंत जोडीला राचेल होंड्रिच व ख्रिस्टन साई यांच्याविरुद्ध १५-२१, १६-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. महिला संघाला सोमवारी आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडा