शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
4
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
5
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
6
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
7
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
8
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
9
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
10
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
11
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
13
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
14
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
15
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
16
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
18
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
19
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
20
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा

आघाडी घेण्याचा भारताचा निर्धार

By admin | Updated: October 23, 2016 03:22 IST

कोटलावर झालेल्या पराभवामुळे महेंद्रसिंग धोनी अ‍ॅन्ड कंपनीला आज रविवारी तिसऱ्या वन डेत विजय मिळवित पाच सामन्यांच्या मालिकेत आघाडी मिळविण्याच्या निर्धाराने

मोहाली : कोटलावर झालेल्या पराभवामुळे महेंद्रसिंग धोनी अ‍ॅन्ड कंपनीला आज रविवारी तिसऱ्या वन डेत विजय मिळवित पाच सामन्यांच्या मालिकेत आघाडी मिळविण्याच्या निर्धाराने खेळावे लागणार आहे. चुकांपासून बोध घेतल्याशिवाय विजय सोपा नाही, ही जाण्ीाव देखील टीम इंडियाला बाळगावी लागेल.धर्मशाला येथे पहिल्या सामन्यात भारताने एकतर्फी विजयाची नोंद केल्यानंतर फिरोजशाह कोटलावर दुसरा वन डे सहा धावांनी गमविला होता. यामुळे मालिका १-१ ने बरोबरीत आहे. कसोटी मालिका गमविणाऱ्या न्यूझीलंड संघात पहिल्या वन डे विजयामुळे उत्साह संचारला. यामुळे मोहाली वन डे रोमांचक होईल, यात शंका नाही. दिल्लीतील पराभवासाठी धोनीने फलंदाजांना दोष दिला होता. यजमान संघ २४३ धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला. विराट कोहली नऊ धावा काढून बाद झाला तर एकही अन्य फलंदाज मोठी भागीदारी करू शकला नव्हता. सलामीचा रोहित शर्मा दोन्ही सामन्यात १४ आणि १५ धावांवर बाद झाला. मनीष पांडे देखील अपयशी ठरला. दोन्ही सामन्यात एकटा विराट फलंदाजीत चमकला हे विशेष. आजारी सुरेश रैना मागच्या दोन्ही सामन्यात खेळू शकला नाही. हार्दिक पांड्या आणि केदार जाधव मात्र तळाच्या स्थानावर धावा काढण्यात सक्षम आहेत. गोलंदाजीत दोघांचीही कामगिरी समाधानकारक आहे. एकीकडे फलंदाजांनी मात्र निराशा केली पण गोलंदाजीत अमित मिश्रा, केदार जाधव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना त्रस्त करून सोडल्यामुळे मोहालीत देखील त्यांच्याकडून अपेक्षा असतील. मालिका सुरू होण्याआधी न्यूझीलंडला जखमी खेळाडूंची चिंता होती. तथापि विलियम्सनने स्वत: ११८ धावा ठोकल्या. टॉम लेथम याने सातत्याने चांगली फलंदाजी केली पण मार्टिन गुप्तिलकडून निराशा पदरी पडली. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, गुप्तिल, मिशेल सेंटेनर आणि टिम साऊदी यांचा मारा उत्तम आहे. भारताला नमविण्यासाठी हे गोलंदाज जीवापाड मेहनत घेत आहेत. (वृत्तसंस्था)भारताने पंजाब क्रिकेट संघटनेच्या खेळपट्टीवर १३ पैकी ८ सामने जिंकले असून ५ गमविले. धोनीच्या नेतृत्वात भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध २०१३ मध्ये सामना खेळला. धोनीने नाबाद १३९ धावा ठोकून देखील तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नव्हता. भारताने हा सामना चार गड्यांनी गमविला. या मैदानावर आॅस्ट्रेलिया सर्वांत यशस्वी संघ असून न्यूझीलंड पहिलाच सामना खेळेल. ही खेळपट्टी पाहुण्यांसाठी नवी आहे पण पाहुणा संघ येथे जिंकतो, असे मागील निकालावरून स्पष्ट आहे. क्यूरेटर दलजितसिंग यांच्यामते ही खेळपट्टी यजमान संघाला लाभदायी ठरावी. तथापि आॅस्ट्रेलियाने सहापैकी पाच विजय नोंदविल्याने न्यूझीलंड देखील खेळपट्टीचा लाभ घेऊ शकतो.रैना अजूनही अनफिट, रोहितने गाळला घामव्हायरलच्या संक्रमणातून अद्याप सावरला नसल्यामुळे सुरेश रैना न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यासाठी उपलब्ध राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे, पण रोहित शर्माने मात्र आज सरावादरम्यान नेट््समध्ये घाम गाळला. दिल्लीमध्ये यापूर्वी खेळल्या गेलेल्या लढतीत १५ धावा काढून बाद झाल्यानंतर रोहितने रविवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीसाठी आज नेट््समध्ये कसून सराव केला. ४गुरुवारी खेळल्या गेलेल्या लढतीत संघाला विजयासमीप घेऊन जाणारा हार्दिक पांड्या आज ऐच्छिक सराव सत्रात सहभागी झाला नाही. विराट कोहली व अजिंक्य रहाणे या मुख्य फलंदाजांसह कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आज सराव केला. ४धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत रैना बाहेर होता, पण दिल्लीमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीपूर्वी त्याने नेट््समध्ये सराव केला होता, पण सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. त्यामुळे तिसऱ्या लढतीत तो निश्चित खेळेल, असे मानल्या जात होते.सामन्याच्या पूर्वसंध्येला संघाच्या नजीकच्या सूत्राने सांगितले की, ‘मोहालीत खेळल्या जाणाऱ्या लढतीसाठी रैनाचा संघात समावेश नाही. १४ सदस्यांच्या संघात त्याचा समावेश आहे, पण तो अद्याप आजारपणातून सावरलेला नाही.’तिसऱ्या लढतीनंतर त्याला संघात स्थान मिळते किंवा नाही हे निश्चित नाही. कारण या लढतीनंतर उर्वरित दोन सामन्यांसाठी निवड समिती सदस्य संघाची निवड करणार आहेत. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या केदार जाधवने आतापर्यंत फलंदाजी व गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे.सिनिअर फिरकीपटूचा अनुभव आनंददायी : मिश्रालेग स्पिनर अमित मिश्रा भारताच्या वन-डे संघातील नियमित खेळाडू नसला तरी रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या मालिकेत सिनिअर फिरकीपटूच्या भूमिकेचा आनंद घेत आहे. अश्विन व जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे. कसोटी मालिकेत एकही लढत खेळण्याची संधी न मिळाल्यानंतर मिश्राने धर्मशाला व दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या दोन वन-डे लढतीत प्रत्येकी तीन बळी घेत चमकदार कामगिरी केली. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या वन-डेच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना मिश्रा म्हणाला,‘युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचा अनुभव चांगला आहे. ज्यावेळी मला कुणी काही विचारले त्यावेळी मी त्यांना टीप्स दिल्या. बैठकीदरम्यान ते मला विचारणा करतात आणि मी त्यांना मार्गदर्शन करतो. युवा खेळाडूंना मदत करणे माझे कर्तव्य आहे.’मिश्राने माजी सहकारी व सध्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत असलेले अनिल कुंबळे यांचे विशेष आभार मानले. मिश्रा म्हणाला, ‘अनिल कुंबळे यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन मिळते. ते तंत्राबाबत चर्चा करीत नाहीत तर ते मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर देतात. उदाहरण द्यायचे झाल्यास मला कसोटी मालिकेत अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळाले नाही तरी ते मला मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज असायचे. याव्यतिरिक्त चेंडूचा टप्पा कुठे ठेवायचा, वेग किती असायला हवा आणि कुठल्या फलंदाजासाठी कसे क्षेत्ररक्षण सजवायचे, याबाबत आम्ही चर्चा करतो. कुंबळे स्पेशालिस्ट गोलंदाज असले तरी ते तळाच्या फलंदाजांना फलंदाजीबाबत टीप्स देतात. सामन्यात तळाचे फलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.’ उभय संघ भारतमेहंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, केदार जाधव, हार्दिक पांड्या, अमित मिश्रा, अक्षर पटेल, उमेश यादव, धवल कुलकर्णी, जयंत यादव आणि मंदीपसिंग.

न्यूझीलंंडकेन विलियम्सन (कर्णधार), टॉम लेथम, मार्टिन गुप्तिल, रॉस टेलर, ल्यूक रोंची (विकेटकिपर), मिशेल सेंटनर, ईश सोढी, जिम्मी नीशाम, कोरी अ‍ॅण्डरसन, ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी, अँटन डेव्हसिच, डग ब्रेसवेल, मॅट हेन्री आणि बीजे वॉटलिंग.