ऑानलाइन लोकमत
कोची, दि. ८ - वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यात झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात भारत १२४ धावांनी पराभूत झाला आहे. नाणेफेक जिंकत भारताचा कप्तान महेंद्र सिंग धोनीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.वेस्ट इंडिजने भारतासमोर सामना जिंकण्यासाठी ३२२ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताचा फलंदाज शिखर धवनने एकच्याने ९ चौकार लगावत ९२ चेंडूत ६८ धावा केल्या. अजिंक्य रहाणे २४ धावांवर तर, विराट कोहली २ धावांवर बाद झाला असून भारतीय संघातील एकाही खेळाडूने उल्लेखनीय कामगिरी केली नाही.