शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात

By admin | Updated: January 6, 2017 01:12 IST

भारताचा एकेरीतील स्टार टेनिसपटू युकी भांबरीचा चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील ४७व्या स्थानी असलेल्या बेनोइत पेयरे विरुध्द सरळ दोन सेटमध्ये पराभव झाला

चेन्नई : भारताचा एकेरीतील स्टार टेनिसपटू युकी भांबरीचा चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील ४७व्या स्थानी असलेल्या बेनोइत पेयरे विरुध्द सरळ दोन सेटमध्ये पराभव झाला. या निराशाजनक पराभवासह स्पर्धेतील भारताचे आव्हानही संपुष्टात आले आहे.पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळवलेल्या युकीने ७ ब्रेकपॉइंट गमावले. दुसऱ्याच फेरीत त्याला पेयरेविरुद्ध ३-६, ४-६ असा पराभव पत्करावा लागला. दरम्यान, काही गेम जिंकताना त्याने चमकदार खेळ केला खरा, परंतु कामगिरीत सातत्य राखण्यात त्याला अपयश आले. त्याच्याकडून झालेल्या चुकांचा फायदा घेत पेयरेने सामन्यात चांगलेच नियंत्रण राखले. याआधी रामकुमार रामनाथन आणि साकेत माइनेनी यांना पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला होता.अन्य लढतींमध्ये स्पर्धेतील द्वितीय मानांकीत आणि जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानी असलेल्या रॉबर्टो बाउतिस्ता याने उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश करताना ब्राझीलच्या रोजेरिओ डी सिल्वाला ६-३, ६-२ असे नमवले. तसेच, अनुभवी मिखाएल युज्नीने देखील विजयी आगेकूच करताना रेंजो ओलिवोला ६-१, ७-५ असा धक्का दिला. (वृत्तसंस्था)