चँगवॉन - भारताचा 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या 10 मीटर एअर पिस्तुल कनिष्ठ मुले गटात विश्वविक्रमाची नोंद करताना सुवर्णपदक जिंकले. त्याने 245.5 गुणांची कमाई करताना हा विश्वविक्रम नोंदवला. याच गटात भारताच्या अर्जुन सिंग चिमाने ( 218) कांस्यपदक जिंकले. कोरियाच्या होजीन लिमला ( 243.1) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारताच्या 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीची विश्वविक्रमासह सुवर्ण कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 09:27 IST