शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

भारतीय महिला संघ अंतिम फेरीत

By admin | Updated: April 29, 2016 19:19 IST

भारतीय महिला रिकर्व्ह संघाने शुक्रवारी तिरंदाजी विश्वकप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अव्वल मानांकित जर्मनीचा ५-३ ने पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. भारताला सुवर्णपदकासाठी

विश्वकप तिरंदाजी : उपांत्य फेरीत अव्वल मानांकित जर्मनीवर ५-३ ने मातशंघाई : भारतीय महिला रिकर्व्ह संघाने शुक्रवारी तिरंदाजी विश्वकप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अव्वल मानांकित जर्मनीचा ५-३ ने पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. भारताला सुवर्णपदकासाठी अंतिम फेरीत चिनी ताइपेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारत रिकर्व्ह इव्हेंटमध्ये पुरुष गटात आणि मिश्र गटात पदकाच्या शर्यतीत कायम आहे, पण कम्पाऊंडमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक ठरली. दीपिका कुमारी, लैशराम बोम्बाल्या देवी आणि लक्ष्मीराणी माझी यांनी वैयक्तिक गटातील निराशाजनक कामगिरीतून सावरताना जर्मनीच्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत सातव्या मानांकित चिनी ताइपेने त्यांच्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या रशियन संघाचा ६-० ने पराभव केला. रिकर्व्ह गटातील सर्व अंतिम लढत रविवारी होणार आहे तर आज, शनिवारी कम्पाऊंड इव्हेंटची अंतिम फेरी होईल. भारतीय खेळाडूंनी तीन नऊ गुणांची कमाई केली त्यानंतर तीन एक्सचा स्कोअर नोंदवत पहिल्या सेटमध्ये २-० अशी आघाडी घेतली. जर्मनीच्या लिसा उनरू, एलेना रिच्टर व करिना विंटर यांचा समावेश असलेल्या संघाने दुसऱ्या सेटमध्ये शानदार कामगिरी करीत ५७ गुण मिळवले, पण भारतीय संघाने ३-१ ने अघाडी मिळवली होती. त्यानंतर भारतीय संघाने ५-३ ने विजयावर शिक्कामोर्तब केले. चौथ्या मानांकित भारताने १३ व्या मानांकित अमेरिका संघाचा पराभव करीत चांगली सुरुवात केली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत भारताने चीनचा ५-४ ने पराभव केला. अतुन दास, जयंत तालुकदार व मंगलसिंग चम्पिया या तिसऱ्या मानांकित रिकर्व्ह पुरुष संघाला उपांत्य फेरीत शूटआऊटमध्ये दुसऱ्या मानांकित नेदरलँडविरुद्ध ४-५ ने पराभव स्वीकारावा लागला. भारताने पहिल्या फेरीत फ्रान्सचा ५-३ ने तर उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीचा ६-२ ने पराभव केला होता. आता भारतीय पुरुष संघाला कांस्यपदकासाठी प्लेआॅफमध्ये नवव्या मानांकित ब्रिटनविरुद्ध लढत द्यावी लागले. भारतीय पुरुष कम्पाऊंड संघाला पहिल्या फेरीत मानांकनामध्ये खालच्या स्थानावर असलेल्या इराणविरुद्ध २२६-२३३ ने पराभव स्वीकारावा लागला. सहावे मानांकनप्राप्त भारतीय महिला कम्पाऊंड संघाने पहिल्या फेरीत मलेशियाचा २२४-२२३ ने पराभव केला, पण त्यानंतर तिसऱ्या मानांकित जर्मनीविरुद्ध २२०-२२९ ने पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)