शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भारताची भावना जाट ऑलिम्पिकसाठी पात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 03:23 IST

भावना जयपूरमध्ये कोच गुरमुख सिहाग यांच्या मार्गदर्शनात सराव करते

रांची : भारतीय खेळाडू भावना जाट हिने शनिवारी राष्टÑीय अजिंक्यपद स्पर्धेच्या २० कि. मी. चालण्याच्या शर्यतीत नव्या राष्टÑीय विक्रमाची नोंद करीत २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकची देखील पात्रता गाठली. राजस्थानची २३ वर्षांची भावना हिने १:२९.५४ सेकंद वेळेची नोंद करीत आॅलिम्पिकची पात्रता गाठली. आॅलिम्पिकची पात्रता वेळ १:३१.०० सेकंद अशी आहे. गरीब शेतकरी कुटुंबातील या मुलीने मागच्या वर्षी आॅक्टोबरमध्ये झालेल्या राष्टÑीय अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान नोंदविलेला स्वत:चा १:३८.३० सेकंदांचा विक्रम मागे टाकून सर्वोत्कृष्ट कामगिरीसह आज सुवर्ण जिंकले. प्रियंका गोस्वामीने १:३१.३६ सेकंद वेळ नोंदविल्याने ती मात्र टोकियोच्या तिकिटापासून वंचित राहिली.

भावना जयपूरमध्ये कोच गुरमुख सिहाग यांच्या मार्गदर्शनात सराव करते. ती ज्युनियर स्तरावर कधीही खेळली नाही शिवाय भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाच्या कुठल्याही शिबिरात तिचा सहभाग नव्हता. सिनियर स्तरावर २०१६ ला राष्टÑीय आंतरराज्य स्पर्धेत तिने पदार्पण केले होते. हैदराबादमध्ये झालेल्या त्या स्पर्धेत भावना पाचव्या स्थानी होती. भारतीय रेल्वेच्या कोलकाता कार्यालयात भावना तिकीट निरीक्षक आहे. जयपूरच्या मानसिंग स्टेडियमबाहेरच्या सडकेवर ती नियमित सराव करते.भावना आता जपानमध्ये १५ मार्च रोजी होणाऱ्या आशियाई चालण्याच्या शर्यतीत सहभागी होणार आहे. (वृत्तसंस्था)‘माझे स्वप्न साकार झाले. सरावादरम्यान १:२७.०० सेकंद अशी वेळ नोंदवित होते. परिस्थिती अनुकूल राहिल्यास आॅलिम्पिक पात्रता गाठणे कठीण नाही, याची जाणीव होतीच. १:३१.०० सेकंदात मी २० कि. मी. शर्यत पूर्ण करू शकते. मागील काही महिन्यात कोचसह मी गाळलेल्या घामाचे हे बक्षीस आहे.’- भावना जाट, चालण्याच्या शर्यतीची भारतीय खेळाडू. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020ranchi-pcरांची