चेन्नई : दक्षिण कोरियातील इंचियोन येथे १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या १७व्या आशियाई स्पर्धेसाठी आज भारतीय नौकायन संघाची घोषणा करण्यात आली़ यात तामिळनाडू नौकायन असोसिएशनचे (टीएनएसए) महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे़ टीएनएसएचे खेळाडू आॅप्टिमिस्ट २९ ईआर आणि लेजर रेडियल स्पर्धेत सहभाग नोंदवणार आहे़ स्पर्धेची सुरुवात अभ्यास सत्रानंतर २३ सप्टेंबरपासून होत असून सामने २४ ते ३० तारखेपर्यंत चालणार आहे़ टीएनएसएने सांगितले की, २९ ईआर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या वर्षा आणि ऐश्वर्या यांना वगळून इतर खेळाडू लवकरच स्पर्धेसाठी रवाना होणार आहेत़ वर्षा ुआणि ऐश्वर्या स्पेन येथे होणाऱ्या २०१६ च्या ४९ ईआर एफएक्स गटाच्या नौकायन स्पर्धेच्या पात्रतेच्या सामन्यासाठी सहभाग नोंदवणार आहे़ भारतीय संघातील खेळाडू : आॅप्टिमिस्ट सिंगल हेडर- चित्रेश ताथा (टीएनएसए) व रम्या सर्वानन कोर (इंजिनिअर सेलिंग क्लब, पुणे), लेजर रेडियल सिंगल हेडर- नेथरा कुमानन (टीएनएसए) २९ ईआर, डबल हेडर- वर्षा गौतम आणि ऐश्वर्या नेदुनचेझियन (टीएनएसए), हॉबी १६ डबल हेडर- बृजराज वर्मा आणि पंकज कुमार (इंडियन नेव्ही) यांचा समावेश आहे़