शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महिला बुद्धिबळ खेळाडूचा बुरखा घालण्यास नकार, एशियन चॅम्पिअनशिपमधून माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 10:55 IST

भारताची क्रमांक 5 ची बुद्धिबळपटू सौम्याने फेसबुकवर पोस्ट लिहून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

पुणे- महिला ग्रॅण्डमास्टर आणि माजी ज्यूनिअर चॅम्पियन सौम्या स्वामीनाथन हिने एशियन चॅम्पिअनशिपमधून माघार घेतली आहे. 26 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान इराणमध्ये होणाऱ्या चॅम्पिअनमध्ये बुरखा किंवा स्कार्फ घालणं बंधनकारक असल्याने तिथे स्पर्धेतून माघार घेतली आहे. इराणमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी बुरखा किंवा स्कार्फ घालणं खासगी अधिकारांचं उल्लघन असल्याचं म्हणतं सौम्याने स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. 

भारताची क्रमांक 5 ची बुद्धिबळपटू सौम्याने फेसबुकवर पोस्ट लिहून यासंदर्भातील माहिती दिली आहे. 'मला जबरदस्तीने स्कार्फ किंवा बुरखा घालायचा नाही. इराणी कायद्यानुसार जबरदस्तीने बुरखा किंवा स्कार्फ घारणं माझ्या मूलभूत मानवी हक्काचं सगळ उल्लंघन आहे. हे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्यासह विवेक आणि धर्माचं उल्लंघन आहे. अशा परिस्थितीत मी माझ्या अधिकारांची सुरक्षा करण्यासाठी माझ्याकडे दुसरा कुठलाही रस्ता नसल्याने मी इराणला जाणार नाही', असं तिने फेसुबक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

'राष्ट्रीय संघात निवड झाल्यावर मी जेव्हा भारताचं प्रतिनिधित्व करते तेव्हा ते माझ्यासाठी अभिमानस्पद असतं. इतक्या मोठ्या स्पर्धेत मला सहभागी होण्यास मी असमर्थ ठरल्याचं मला दुःख आहे. एका खेळाडूसाठी खेळ ही गोष्ट त्याच्या आयुष्यात सर्वात पहिले महत्त्वाची ठरते. त्यासाठी अनेक तडतोडी कराव्या लागतात. पण काही गोष्टी अशा असतात ज्यामध्ये तडजोड करता येत नाही, असंही तिने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.