शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय बॉक्सर्सना कठीण ड्रॉ, यांच्या कामगिरीवर नजर...

By admin | Updated: August 5, 2016 20:27 IST

भारताच्या तीन सदस्यीय बॉक्सिंग पथकाला आज शनिवारपासून सुरू होत असलेल्या अॉलिम्पिक बॉक्सिंगमध्ये कठीण ड्रॉ मिळाला आहे

ऑनलाइन लोकमतरिओ, दि. ५ : भारताच्या तीन सदस्यीय बॉक्सिंग पथकाला आज शनिवारपासून सुरू होत असलेल्या अॉलिम्पिक बॉक्सिंगमध्ये कठीण ड्रॉ मिळाला आहे. बॉक्सिंगमध्ये भारताने आतापर्यंत दोन पदके जिंकली आहेत. बीजिंगमध्ये २००८ साली विजेंदरसिंगने ७५ किलोचे कांस्य तसेच २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये मेरिकोमने महिला बॉक्सिंगचे ५१ किलो गटात कांस्य जिंकले होते.शिवा थापा ५६ किलो, मनोज कुमार ६४ किलो आणि विकास कृष्णन ७५ किलो यांच्या खांद्यावर भारतीय आव्हानाची जबाबदारी राहील. मागच्या लंडन आॅलिम्पिकमध्येआठ बॉक्सर्स खेळले होते. यंदा विकासला सातवे मानांकन मिळाले पण कुणालाही पहिल्या फेरीत पुढे चाल मात्र मिळालेली नाही.

आशियाडचा सुवर्ण विजेता आणि विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदकाची कमाई करणारा विकासचा सामना १० आॅगस्ट रोजी अमेरिकेचा १८ वर्षांचा खेळाडू चार्ल्स कोनवेलविरुद्ध होईल. त्याआधी शिवाला ९ आॅगस्ट रोजी क्यूबाचा सहावा मानांकित रोबेइसी सामिरेज याच्याविरुद्ध खेळायचे आहे. २०१० च्या युवा आॅलिाम्पिकच्या अंतिम फेरीत शिवाला रोबेइसीकडून पराभवाचा धक्का बसला आहे. मनोज १० आॅगस्ट रोजी लिथुआनियाचा माजी युवा आॅलिम्पिक सुवर्ण विजेता एवाल्डास पेत्राउस्कास याच्याविरुद्ध खेळेल.

राष्ट्रीय महासंघात भांडणे सुरू असल्याने देशात या खेळाची अधोगती झाली. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने भारतीय बॉक्सिंग फेडरेशनला निलंबित केल्यामुळे चार वर्षांपासून सिनियर नॅशनलचे आयोजनच होऊ शकले नाही.बॉक्सर्सना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची देखील संधी मिळाली नाही. रिओ आॅलिम्पिक पथकात कुणी नवा चेहरा स्थान मिळवू शकला नसला तरी शिवा, विकास आणि मनोज यांचा अनुभव दांडगा आहे. चार वर्षांआधी शिवा भारतीय बॉक्सिंगपथकातील सर्वांत लहान वयाचा खेळाडू होता. तो पराभूत झाला, पण यंदा त्याच्याकडूनच आशा आहे.

विकास विश्व रँकिंगमध्ये सहाव्या स्थानावर आहे. लंडन आॅलिम्पिकमध्ये वादग्रस्त निर्णयाद्वारे त्याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. विकासचा रिव्ह्यू देखील फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्याने आश्यिाई स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. बाकू येथे विश्व बॉक्सिंग स्पर्धेद्वारे त्याने रिओचे तिकीट मिळविले आहे. मनोज तिघांमध्ये सर्वाधिक अनुभवी आहे.लंडनमध्ये स्थानिक खेळाडू थॉमस स्टकरकडून तो पराभूत झाला होता