शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आशिया स्पर्धेत राष्ट्रध्वजाखाली खेळू शकणार भारतीय बॉक्सर

By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST

नवी दिल्ली : वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या बॉक्सिंग इंडियाच्या निवडणुका वेळेत न झाल्यास भारतीय मुष्टियोद्ध्यांना १९ सप्टेंबरपासून सुरूहोणार्‍या इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय ध्वजाखाली खेळण्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या बॉक्सिंग इंडियाच्या निवडणुका वेळेत न झाल्यास भारतीय मुष्टियोद्ध्यांना १९ सप्टेंबरपासून सुरूहोणार्‍या इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय ध्वजाखाली खेळण्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
साईचे महासंचालक जीजी थॉम्सन यांनी ही शंका उपस्थित केली. ते म्हणाले, बॉक्सिंग इंडियाच्या निवडणुका वेळेत न झाल्यास आमच्या मुष्टियोद्ध्यांना आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाच्या राष्ट्रीय ध्वजाखाली खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यानही भारतीय खेळाडू खूप निराश होते. तातडीने निवडणुका होतील हा विचार करून त्या स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवला होता. वेळेत निवडणुका होतील अशी मला आशा आहे. अन्यथा आमचे मुष्ट्यिोद्धे राष्ट्रीय ध्वजाखाली खेळू शकणार नाहीत.
साईचे कार्यकारी संचालक सुधीर सोतिया यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या सापत्न वागणुकीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय मुष्ट्यिोद्ध्यांना खूपच नुकसान सहन करावे लागत आहे. हे बॉक्सिंग इंडिया आणि एआयबीए यांच्यातील प्रकरण आहे आणि त्यात सरकार अथवा साई हस्तक्षेप करूशकत नाही. मुष्टियोद्ध्यांना परदेशात सराव अथवा प्रशिक्षणासाठी पाठवायचे असल्यास त्यांना पाठवण्याची आम्हाला कोणतीही अडचण नाही; परंतु एआयबीएच्या सापत्न वागणुकीमुळे आता कोणताही देश आम्हाला आमंत्रित करीत नाही. परदेशात स्पर्धा किंवा दौरा या आमंत्रणावर आधारित असतात. गत दहा वर्षांपासून क्युबाने भारतीय मुष्टियोद्ध्यांना नेहमीच मदत केली आहे; परंतु एआयबीएच्या वर्तनामुळे त्यांनी देखील आमच्या मुष्टियोद्ध्यांना आमंत्रित करण्यास नकार दिला आहे. आम्हाला विविध सूत्रांनुसार भारतीय मुष्टियोद्ध्यांच्या वादामुळे खूप नुकसान झाले आहे. प्रशिक्षकांनाही भारतीय खेळाडू आशियाई स्पर्धेत राष्ट्रध्वजाखाली खेळू शकणार नसल्याची भीती आहे.