शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रकुल यजमानपदासाठी भारत प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 01:47 IST

बर्मिंगहॅम स्पर्धेसाठी पथक पाठविणार

नवी दिल्ली : ‘२०२६ किंवा २०३० राष्ट्रकुल स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारत दावेदारी सादर करणार आहे,’ असे भारतीय आॅलिम्पिक महासंघाने (आयओए) सोमवारी म्हटले. त्याचसोबत आयओएने नेमबाजीला वगळल्यामुळे २०२२ बर्मिंगहॅम स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय बदलण्यास सहमती दर्शवली असल्याचेही यावेळी आयओएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.आॅलिम्पिक खेळाची देशातील अव्वल संस्था आयओए आता राष्ट्रकुल स्पर्धेच्या यजमानपदासाठी आवश्यक मंजुरी मिळविण्यासाठी सरकारसोबत संपर्क साधणार आहे. भारताने २०१० मध्ये या स्पर्धेचे यजमानपद भूषविले होते. वार्षिक आमसभेदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी सांगितले की, ‘आम्ही २०२६ किंवा २०३० च्या राष्ट्रकुल यजमानपदासाठी दावेदारी सादर करण्याचा निर्णय घेतला. तसएच आम्ही २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपले पथक पाठविण्याचा निर्णयही घेतला.’ आयओएने भारतीय रायफल महासंघाच्या (एनआरएआय) बर्मिंगहॅम स्पर्धेपूर्वी वेगळ्या राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या यजमानपदाच्या प्रस्तावाला स्वीकृतीही दिली. त्यामुळे २०२२ च्या स्पर्धेतून नेमबाजीला वगळण्याच्या निर्णयाची काही अंशी भरपाई होईल, अशी आशा आहे. आयओए लवकरच एनआरएआयचा प्रस्ताव स्वीकृतीसाठी राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडे (सीजीएफ) पाठविणार आहे. त्यानंतर सीजीएफ कार्यकारी समिती यावर निर्णय घेईल.गेल्या आठवड्यात सीजीएफने याबाबत एनआरएआयला पुढील महिन्याच्या सुरुवातीपर्यत औपचारिक प्रस्ताव पाठविण्यास सांगितले होते. एनआरएआयने या स्पर्धेच्या यजमानपदाचा खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत ‘वैकल्पिक खेळ’ मध्ये समावेश असलेल्या नेमबाजीला बर्मिंगहॅम स्पर्धेतून वगळल्यानंतर आयओए प्रमुख नरिंदर बत्रा यांनी भारताने या स्पर्धेतून माघार घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता.