शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

भारत यंदाही खेळणार सायंकाळच्या सत्रात

By admin | Updated: December 31, 2016 01:59 IST

टेनिस चाहत्यांचा विचार करता भारत सलग दुसऱ्यांदा डेव्हिस कप लढत सायंकाळच्या सत्रात खेळणार आहे. आशिया ओसियाना गट एकमध्ये भारत आणि न्यूझीलंड

नवी दिल्ली : टेनिस चाहत्यांचा विचार करता भारत सलग दुसऱ्यांदा डेव्हिस कप लढत सायंकाळच्या सत्रात खेळणार आहे. आशिया ओसियाना गट एकमध्ये भारत आणि न्यूझीलंड संघादरम्यानची लढत ३ फेब्रुवारीपासून पुणे येथे खेळली जाणार आहे. शुक्रवारी एकेरीची लढत दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे, तर त्यानंतरच्या दिवशी दुहेरीची लढत सायंकाळी ६ वाजता सुरू होईल. रविवारी खेळला जाणारा परतीचा एकेरीचा सामना ३ वाजता सुरू होईल. स्पेनविरुद्ध दिल्लीमध्ये सप्टेंबर महिन्यात विश्व ग्रुप प्ले आॅफ लढतीदरम्यान एकेरीचे सामने सायंकाळी ५ वाजता, तर दुहेरीची लढत रात्री ७ वाजता सुरू झाली होती. वेळेबाबत खेळाडूंसोबत चर्चा करण्यात आली, पण कर्णधार आनंद अमृतराजचा सल्ला घेण्यात आला नाही. कारण अमृतराज तोपर्यंत पदावर कायम राहतील किंवा नाही, याबाबत एआयटीएमध्ये साशंकता होती. ‘एआयटीए’चे सचिव हिरणमय चॅटर्जी यांनी सांगितले की, ‘स्पर्धा संचालक सुंदर अय्यर यांनी चाहत्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी सामने सायंकाळच्या सत्रात आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. निवड समितीचे अध्यक्ष एस. पी. मिश्रा यांनी खेळाडूंसोबत याबाबत चर्चा केली. आम्ही आयटीएफसोबत चर्चा केली. तापमानामध्ये अधिक फरक पडणार नसल्यामुळे त्यांनी याला मंजुरी प्रदान केली.’ काही बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार एआयटीएचा आहे, असे चॅटर्जी यांनी सांगितले. एआयटीएचे एक अधिकारी म्हणाले,‘आम्ही सायंकाळच्या सत्रात सामन्याचे आयोजन केले तर मुंबईहूनही लोकांना सामने बघण्यासाठी येता आणि परतही जाता येईल. भारत खेळत असताना स्टेडियम गर्दीने फुललेले असावे, असा आम्हाला वाटते.’ (वृत्तसंस्था) लढतीच्या वेळेबाबत माझ्यासोबत चर्चा करण्यात आलेली नाही, पण याचा सामन्याच्या निकालावर फरक पडणार नाही. फेब्रुवारी महिन्यात लढत होणार असल्यामुळे सामन्याच्या निकालावर विशेष परिणाम होणार नाही. पुण्यात चेन्नईसारखे दमट वातावरण नसते, पण मी स्वत: खेळत असतो, तर दिवसा खेळण्याला पसंती दर्शवली असती. - आनंद अमृतराज