शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भारत असुरक्षित, तू जाऊ नकोस; स्क्वॉश खेळाडूच्या पालकांनी मुलीला थांबवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 15:37 IST

जागतिक क्रमवारीत आघाडीवर असलेली अॅम्ब्रे अॅलिंचक्स हीने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात न येण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नई - जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धा आयोजनाचा मान भारताला मिळाला आहे. चेन्नईत 17 जुलैपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत 28 देशांचे खेळाडू व अधिकारी दाखल झाले आहेत. मात्र, स्वित्झर्लंडच्या ताफ्यात एका नावाची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. जागतिक क्रमवारीत आघाडीवर असलेली अॅम्ब्रे अॅलिंचक्स हीने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात न येण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात महिला अत्याचाराच्या वाढत असलेल्या घटनांमुळे अॅलिंचक्सच्या पालकांनी तिला भारतात जाण्याची परवानगी दिली नसल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. स्वित्झर्लंड संघाचे प्रशिक्षक पॅस्कल भुरीन यांनी सांगितले की, अॅम्ब्रे अॅलिंचक्स ही अव्वल क्रमांकाची खेळाडू आहे. पालकांनी तिला भारतात येण्याची परवानगी दिली नसल्याने ती या स्पर्धेत सहभागी झालेली नाही. भारतात महिला अत्याचाराच्या घटनांबद्दल त्यांनी इंटरनेटवर वाचले होते आणि त्यामुळे त्यांनी मुलीच्या बाबतीत धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान खेळाडूंना येथे असुरक्षित वाटलेले नाही. इराण, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेने या संदर्भात चिंता व्यक्त केली होती. जागतिक स्क्वॉश फेडरेशननेही अॅलिंचक्सच्या पालकांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. 

टॅग्स :Sportsक्रीडा