नवी दिल्ली : देशातील क्रीडा संघटनांमध्ये गटबाजी आणि अंतर्गत कलह असून, व्यावसायिकतेचा अभाव जाणवतो. या कारणांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडू कामगिरीत माघारत असल्याचे क्रीडामंत्री विजय गोयल यांचे मत आहे.लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात गोयल यांनी ही कारणे सांगितली. ते म्हणाले, ‘काही वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. पण त्या तुलनेत पदके मात्र मिळताना दिसत नाहीत. २०१६च्या आॅलिम्पिकमध्ये पहिल्यांदा ११९ खेळाडू पात्र ठरले होते. तथापि पदाकांच्या शर्यतीत आमचे खेळाडू माघारतात. त्यामागील कारणांचा ऊहापोह करताना गोयल यांनी व्यावसायिकपणाचा अभाव, अंतर्गत कलह तसेच गटबाजी तसेच राष्ट्रीय महासंघांकडे दीर्घकालीन योजनांचा अभाव आदी बाबी नमूद केल्या.विविध क्रीडा महासंघात महिला कोच आणि महिला खेळाडूंना होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल विचारताच मंत्री म्हणाले, ‘असा कुठलाही प्रकार क्रीडा मंत्रालयाच्या नजरेस पडलेला नाही.’
भारत खेळात माघारला - विजय गोयल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:23 IST