नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात बांगलादेश दौरा करणार असून यामध्ये उभय संघांमध्ये एक कसोटी सामना आणि तीन वनडे सामना होईल.बीसीसीआयने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार भारतीय संघ ७ जूनला बांगलादेशला रवाना होईल. दोन्ही संघांमधील एकमेव कसोटी सामना १0 जून पासून फतुल्लाह येथे खेळविला जाईल. यानंतर मीरपूर येथे १८, २१ आणि २४ जूनला तीन एकदिवसीय सामने होतील. २६ जूनला भारत दौऱ्यावरुन परत येईल. जून महिन्यात पावसाची शक्यता गृहीत धरुन वनडे सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
जूनमध्ये भारताचा बांगलादेश दौरा
By admin | Updated: May 6, 2015 02:44 IST