शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भारताने घेतली २८५ धावांची आघाडी

By admin | Updated: August 13, 2016 05:59 IST

भुवनेश्वर कुमारने केलेल्या भेदक स्विंग माऱ्याच्या जोरावर भारताने चौथ्या दिवशी यजमान वेस्ट इंडिजला २२५ धावात गुंडाळून दिवसअखेर २८५ धावांची शानदार आघाडी घेतली.

ऑनलाइन लोकमत

ग्रोस इसलेट, दि. १३  -  भुवनेश्वर कुमारने केलेल्या भेदक स्विंग माऱ्याच्या जोरावर भारताने चौथ्या दिवशी यजमान वेस्ट इंडिजला २२५ धावात गुंडाळून दिवसअखेर २८५ धावांची शानदार आघाडी घेतली. भुवनेश्वरने ३३ धावात ५ बळी घेत विंडिजचे कंबरडे मोडले. सलामीवीर क्रेग ब्रेथवेटच्या (६४) अर्धशतकाच्या जोरावर यजमानांनी दमदार कूच केली होती.

चौथ्या दिवशी केएल राहुल २८  धावांवर बाद झाला. शिखर धवन २६ धावा काढून पायचित झाला, तर विराट कोहली अवघ्या ४ धावा काढून तंबूत परतला. भारताच्या दिवसअखेर ३९ षटकात तीन बाद १५७ धावा झाल्या. रहाणे (५१) आणि रोहित शर्मा (४१) खेळत आहेत.

तिसऱ्या दिवशी पावसामुळे एकही चेंडूचा खेळ न झाल्यानंतर चौथ्या दिवशी विंडिजने १ बाद १०७ धावांवरुन खेळण्यास सुरुवात केली. ब्रेथवेट - डॅरेन ब्रावो ही जमलेली जोडी भारताला झुंजवणार असे दिसत असतानाच, इशांत शर्माचा आखूड टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न चुकल्याने ब्रावो झेलबाद होऊन परतला. ब्रावोने १०१ चेंडूत ३ चौकारांसह २९ धावा काढल्या. त्याने ब्रेथवेटसह दुसऱ्या विकेटसाठी ७० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ब्रेथवेटला अश्विनने बाद करुन भारताला तिसरे यश मिळवून दिले. त्याने १६३ चेंडूत ६ चौकारांसह ६४ धावा फटकावल्या. यावेळी भारत आपली पकड मजबूत करणार अशी चिन्हे होती. मात्र अनुभवी मार्लोन सॅम्युअल्स (४८) आणि जेरमेन ब्लॅकवूड (२०) यांनी विश्रांतीपर्यंत भारताला यश मिळू दिले नाही. यानंतर मात्र भुवनेश्वरने सामन्याचे चित्रच पालटले. आपल्या भेदक स्विंग माऱ्याच्या जोरावर त्याने ब्लॅकवूड, शेन डॉर्विच (१८), कर्णधार जेसन होल्डर (२), अलझारी जोसेफ (०) यांना बाद केले. अवघ्या १० धावांत ४ बळी गमावल्याने विंडिजची ४ बाद २०२ धावांवरुन ८ बाद २१२ अशी अवस्था झाली. यानंतर कमिन्स आणि डॉर्विचही झटपट परतल्याने यजमानांचा डाव संपुष्टात आला. भुवनेश्वरने केलेल्या अचूक गोलंदाजीला फिरकीपटू आर. अश्विनने पुरेपुर साथ दिली. त्याने ५२ धावात २ बळी घेतले. तर इशांत शर्मा, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ बळी घेतले.