शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

डोपिंगमध्ये सलग तिसऱ्यांदा भारत तिसऱ्या स्थानी

By admin | Updated: April 5, 2017 00:14 IST

भारताने सलग तिसऱ्या वर्षी तिसरे स्थान पटकावल्याची माहिती विश्व डोपिंग विरोधी एजन्सीच्या(वाडा) ताज्या अहवालात दिली आहे

नवी दिल्ली : क्रीडाविश्वात भारताने अद्याप गरुडझेप घेतलेली नाही. पण प्रतिबंधित औषध सेवनात मात्र भारताने सलग तिसऱ्या वर्षी तिसरे स्थान पटकावल्याची माहिती विश्व डोपिंग विरोधी एजन्सीच्या(वाडा) ताज्या अहवालात दिली आहे. २०१५ पासून एकूण ११७ खेळाडू दोषी आढळल्याचे वाडाने सांगितले.वाडाने डोपिंगची जी प्रकरणे तपासली आणि त्यातून निष्कर्ष काढल्यानुसार भारतापेक्षा अधिक आकडा रशियाचा आहे. रशियाचे १७६, आणि इटलीचे १२९ खेळाडू दोषी आढळल्याने ही दोन्ही राष्ट्रे पहिल्या दोन स्थानावर आहेत. भारत २०१३ आणि २०१४ मध्येही तिसऱ्या स्थानी कायम होता. भारतीयांची डोपिंग परीक्षणे लघवीच्या नमुन्याद्वारे तपासण्यात आली. ही चाचणी २०१५ दरम्यान घेण्यात आली होती. वाडाने विविध मान्यताप्राप्त डोपिंग विरोधी संस्थांकडून यंदा ३१ जानेवारीपर्यंत विश्लेषणात्मक निष्कर्ष काढले. शिवाय प्रतिबंधांबाबत माहिती एकत्र केल्यानंतर ही यादी जाहीर केली आहे. वाडाच्या संशोधित नियमानुसार हा तिसरा अहवाल आला आहे, भारतासाठी चिंतेची बाब अशी की या तिन्ही वर्षांत दोषी खेळाडूंच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वाडाने २०१३ मध्ये ९१ आणि २०१४ मध्ये भारताच्या ९६ खेळाडूंना दोषी धरले होते. डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन हा मोठा गुन्हा असून याअंतर्गत खेळाडूंवर बंदीची कारवाई केली जाते. २०१५ पासून भारताचे जे ११७ खेळाडू दोषी आढळले त्यात दोन खेळाडू एडीआरव्ही (नमुना देण्यास टाळाटाळ करणारे खेळाडू) आहेत. ११५ खेळाडू नमुन्यात प्रतिबंधित द्रव्य आढळून आलेले आहेत. त्यात ७८ पुरुष आणि ३७ महिलांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)>प्रतिबंधित औषध सेवनात दोषीभारोत्तोलन:३२ पुरुष २४ महिला, अ‍ॅथ्लेटिक्स १४ पुरुष ७ महिला, बॉक्सिंग ८, कुस्ती ८, सायकलिंग ४, कबड्डी ४, जलतरण ३, पॉवर लिफ्टिंग ३, ज्युडो २, वुशू २, रोर्इंग आणि बॉडी बिल्डिंग प्रत्येकी १, हॉकी १, फुटबॉल १, स्ट्रीट हॉकी १ अशी भारतातील दोषी खेळाडूंची संख्या आहे.