शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

भारत ‘अ’चा दमदार विजय

By admin | Updated: September 29, 2015 23:28 IST

भारत ‘अ’ संघाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावातही बांगलादेश ‘अ’ संघाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. भारत ‘अ’ संघाने मंगळवारी संपलेल्या एकमेव अनधिकृत तीन दिवसीय कसोटी सामन्यात

बंगळुरू : भारत ‘अ’ संघाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावातही बांगलादेश ‘अ’ संघाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. भारत ‘अ’ संघाने मंगळवारी संपलेल्या एकमेव अनधिकृत तीन दिवसीय कसोटी सामन्यात बांगलादेशचा एक डाव ३६ धावांनी पराभव केला. कालच्या २ बाद ३६ धावसंख्येवरून पुढे खेळताना बांगलादेश ‘अ’ संघाचा दुसरा डाव ३९.३ षटकांत १५१ धावांत संपुष्टात आला. ईश्वर पांडे आणि जयंत यादव यांनी अनुक्रमे २८ व ४८ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी ३ बळी घेतले. अभिमन्यू मिथुनने २३ धावांच्या मोबदल्यात दोन बळी घेत त्यांना योग्य साथ दिली. भारत ‘अ’ संघाने पहिला डाव ५ बाद ४११ धावसंख्येवर घोषित केला होता. बांगलादेश ‘अ’ संघाचा पहिला डाव २२८ धावांत संपुष्टात आला होता. बांगलादेश संघापुढे भारताची पहिल्या डावातील आघाडी संपविण्याचे व चांगले लक्ष्य उभे करण्याचे आव्हान होते, पण बांगलादेश ‘अ’ संघावर डावाने पराभव स्वीकारण्याची नामुष्की ओढवली. बांगलादेशच्या केवळ पाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदवता आली. कर्णधार मोमिनुल हक (५४) आणि यष्टिरक्षक फलंदाज लिट्टन दास (३८) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. मोमिनुल व लिट्टन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. पांडेने लिट्टनला क्लिन बोल्ड करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. दोन चेंडूंनंतर पांडेने पहिल्या डावातील शतकवीर शब्बीर रहमानला तंबूचा मार्ग दाखवत तिसरा बळी घेतला. पांडेने सोमवारी सलामीवीर अनामुल हक (०) याला बाद केले होते. मिथुनने त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला दुहेरी धक्का दिला. पहिल्या चेंडूवर नासीर हुसेनला (१०) बाद केल्यानंतर होम याला २३ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर यादवकडे झेल देण्यास भाग पाडले. त्या वेळी बांगलादेशची ६ बाद ८७ अशी अवस्था झाली होती. मोमिनुलने त्यानंतर सकलेन साजिब (२१) याच्यासोबत ३३ धावांची भागीदारी केली.(वृत्तसंस्था)------------दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका अत्यंत अटीतटीची व रोमांचक होईल. घरच्या वातावरणाचा टीम इंडियाला फायदा मिळेल. मात्र या वातावरणाचा फायदा उचलण्यात यशस्वी ठरल्यास निश्चित या मालिकेत टीम इंडिया विजयी होईल. - शिखर धवन----------धावफलकबागंलादेश पहिला डाव : २२८. भारत ‘अ’ पहिला डाव : ५ बाद ४११ (डाव घोषित); बांगलादेश दुसरा डाव : अनामुल हक झे. नायर गो. पांडे ०, सौम्या सरकार झे. नायर गो. यादव १९, मोमिनुल हक झे. जडेजा गो. यादव ५४, लिट्टन दास त्रि. गो. पांडे ३८, शब्बीर रहमान पयाचित गो. पांडे ०, नासीर हुसेन त्रि. गो. मिथुन १, एस. होम झे. यादव गो. मिथुन ०, सकलेन साजीब झे. अय्यर गो. यादव २१, शफीउल इस्लाम नाबाद १३, जुबेर हुसेन यष्टिचित ओझा गो. जडेजा १, रुबेल हुसेन (अनुपस्थित). अवांतर (४). एकूण ३९.३ षटकांत सर्व बाद १५१. बाद क्रम : १-४, २-२१, ३-८२, ४-८२, ५-८७, ६-८७, ७-१२०, ८-१५०, ९-१५१. गोलंदाजी : पांडे १०-३-२८-३, मिथुन ७-२-२३-२, यादव १२-१-४८-३, जडेजा ६.३-१-२७-१, अ‍ॅरोन ४-१-२४-०.