चौथी वनडे : इंग्लंडवर 9 गडय़ांनी मात, रहाणो-धवनची शतकी सलामी
बर्मिघम : भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करीत रचून दिलेल्या पायावर शतकवीर अजिंक्य रहाणो (1क्6 धावा, 1क्क् चेंडू, 1क् चौकार, 4 षटकार) व शिखर धवन (नाबाद 97 धावा, 81 चेंडू, 11 चौकार, 4 षटकार) यांनी सलामीला 183 धावांची भागीदारी करीत विजयाचा कळस चढविला व मंगळवारी खेळल्या गेलेल्या चौथ्या वन-डे सामन्यात भारताने इंग्लंडचा 9 गडय़ांनी पराभव करीत पाच सामन्यांच्या मालिकेत 3-क् अशी विजयी आघाडी घेतली.
भारताने या मालिकेत विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. भारताने इंग्लंडचा डाव डाव 2क्6 धावांत गुंडाळला आणि विजयासाठी आवश्यक धावा 3क्.3 षटकांत एका गडय़ाच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना रहाणो व धवन यांनी शतकी भागीदारी 1क्6 चेंडूत करीत विजय निश्चित केला. रहाणो बाद झाल्यानंतर धवनने (नाबाद 97) कोहलीच्या (क्1) साथीने विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी, मोईन अलीने (67) केल्यामुळे इंग्लंडला सन्मानजनक धावसंख्येची मजल मारता आली. इंग्लंडचा डाव 49.3 षटकांत 2क्6 धावांत संपुष्टात आला. इंग्लंडच्या केवळ तीन फलंदाजांना 2क् धावांची वेस ओलांडता आली. मोईनने वन-डे कारकीर्दीतील दुसरे अर्धशतक झळकविताना 5क् चेंडूंना सामोरे जात 4 चौकार व 3 षटकार लगावले. मोहम्मद शमीने 38 धावांच्या मोबदल्यात 3 बळी घेतले. भुवनेश्वर (2-14) व जडेजा (2-4क्) यांनी प्रत्येकी 2 तर अश्विन व सुरेश रैना यांनी प्रत्येकी 1 बळी घेत शमीला योग्य साथ दिली. धवल कुळकर्णीने 7 षटके गोलंदाजी केली, पण बळीचा विचार करता त्याची पाटी कोरीच राहिली. (वृत्तसंस्था)
इंग्लंड : कुक ङो. रैना गो. भुवनेश्वर क्9, अॅलेक्स हेल्स त्रि. गो. भुवनेश्वर क्6, गॅरी बॅलेन्स ङो. रहाणो गो. शमी क्7, जो रुट ङो. कुळकर्णी गो. रैना 44, मोर्गन ङो. रैना गो. जडेजा 32, जोस बटलर पायचित गो. शमी 11, मोईन अली त्रि. गो. अश्विन 67, ािस व्होक्स धावबाद 1क्, स्टिव्हन फिन त्रि. गो. जडेजा क्2, जेम्स अॅन्डरसन नाबाद क्1, हॅरी गुर्नी त्रि. गो. शमी क्3. अवांतर (14). एकूण 49.3 षटकांत सर्वबाद 2क्6 गोलंदाजी : भुवनेश्वर 8-3-14-2, कुळकर्णी 7-क्-35-क्, शमी 7.3-1-28-3, अश्विन 1क्-क्-48-1, जडेजा 1क्-क्-4क्-1, रैना 7-क्-36-1.भारत : अजिंक्य रहाणो ङो. कुक गो. गुर्ने 1क्6, शिखर धवन नाबाद 97, विराट कोहली नाबाद क्1. अवांतर (क्8). एकूण 3क्.3 षटकांत 1 बाद 212. बाद क्रम : 183. गोलंदाजी : अॅन्डरसन 6-1-38-क्, गुर्ने 6.3-क्-51-1, फिन 7-क्-38-क्, व्होक्स 4-क्-4क्-क्, मोईन अली 7-क्-4क्-क्.