शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
5
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
6
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
7
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
8
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
9
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
10
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
11
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
12
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
13
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
14
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
15
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
16
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
17
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
18
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
19
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
20
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक

भारताला ‘क्लीन स्वीप’ची संधी

By admin | Updated: July 14, 2015 02:59 IST

मालिकेत अपराजित आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाला मंगळवारी झिम्बाब्वेविरुद्ध तिसरा आणि अखेरचा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत ‘क्लीन स्वीप’ करण्याची संधी असेल.

हरारे : मालिकेत अपराजित आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाला मंगळवारी झिम्बाब्वेविरुद्ध तिसरा आणि अखेरचा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत ‘क्लीन स्वीप’ करण्याची संधी असेल.पहिला सामना ४ धावांनी जिंकल्यानंतर चुकांपासून बोध घेऊन अष्टपैलू कामगिरीच्या बळावर कालच्या लढतीत भारताने ६२ धावांनी विजय साजरा केला. कर्णधार अजिंक्य रहाणे ६३ आणि सलामीवीर मुरली विजय ७२ तसेच अंबाती रायुडू ४१ यांनी दमदार फलंदाजी करून विजयाचा पाया रचला. तथापि रायुडूचे जखमी होणे भारतीय संघासाठी धक्कादायक ठरले. त्याची जागा संजू सॅमसन याने घेतली आहे. उद्या मनीष पांडे वन डेत पदार्पण करेल, अशी शक्यता आहे. सॅमसन सामन्याच्या वेळेपर्यंत पोहोचू शकणार नसल्याने पांडेची वर्णी लागू शकते. फलंदाजांसोबत गोलंदाजांची कामगिरीही अप्रतिम झाली. पहिल्या सामन्यात दिशाहीन मारा करणाऱ्या या गोलंदाजांनी काल परिस्थितीचा पुरेपूर लाभ घेतला. भुवनेश्वर कुमारने ४ गडी बाद केले, तर सिनियर आॅफ स्पिनर हरभजनसिंग याने १० षटकांत २९ धावा देऊन एक गडी बाद केला. झिम्बाब्वेच्या नजरा पहिल्या सामन्यातील भरीव कामगिरीची पुनरावृत्ती करण्याकडे असतील. त्यांच्या हितावह बाब अशी, की त्यांच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधीच दिली नाही. सातत्याने धावा रोखल्यामुळे भारतीय फलंदाजांवर दडपण आले होते. फलंदाजीत सलामीचा चामू चिभाभा हा एकटा संघर्ष करीत आहे. त्याची सोबत करण्यासाठी अन्य फलंदाजांना धावा काढाव्याच लागतील. (वृत्तसंस्था)रायुडू झिम्बाब्वे दौऱ्यातून ‘आउट’; सॅमसनचा संघात समावेशहरारे : यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन याचा जखमी अंबाती रायुडू याच्या जागी झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. सॅमसनच्या समावेशाला बीसीसीआयच्या मेडिकल टीमने दुजोरा दिला आहे. दुसऱ्या वनडेदरम्यान अंबाती रायुडूला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो झिम्बाब्वे दौऱ्यातील उर्वरित सामने खेळू शकणार नाही. त्याला दोन ते तीन आठवडे रिहॅबिलिटेशनची आवश्यकता आहे. त्यामुळे राष्ट्रीय निवड समितीने अंबाती रायुडूचा पर्याय म्हणून संजू सॅमसनला पाठवण्यात आल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. सॅमसनला भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून चांगली कामगिरी केली आहे.