इंचियोन : ड्रॅग फ्लिकर रूपिंदर पाल सिंहच्या (३ गोल) शानदार हॅट्ट्रिकच्या बळावर भारतीय पुरुष संघाने आशियाई स्पर्धेतील सलामीच्या हॉकी सामन्यात श्रीलंकेचा ८-० ने धुव्वा उडवून आपल्या अभियानाची धडाक्यात सुरुवात केली़चार क्वार्टरच्या नव्या फॉरमॅटमध्ये खेळविण्यात येणाऱ्या या संपूर्ण लढतीत भारताने आपले वर्चस्व राखले़ भारतीय संघ पहिल्या दोन क्वार्टरनंतर ५-० ने आघाडीवर होता़ त्यानंतर अखेरच्या दोन क्वार्टरमध्ये टीम इंडियाने आणखी ३ गोल नोंदविले़ भारताकडून रूपिंदरने सामन्याच्या १२व्या, ४३ व्या आणि ४६ व्या मिनिटाला गोल नोंदविले़ या व्यतिरिक्त रमणदीप सिंह याने शानदार २ गोल केले, तर निकीतन थिमैया, व्ही. आऱ रघुनाथ, कंगुजम चिंगलेनसाना सिंह यांनी प्रत्येकी १ गोल नोंदवून संघाला मोठा विजय मिळवून दिला़ भारताचा दुसरा सामना २३ सप्टेंबर रोजी ओमनशी होणार आहे़ (वृत्तसंस्था)
भारताकडून श्रीलंकेचा ८-० ने धुव्वा
By admin | Updated: September 22, 2014 04:25 IST