शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

पराभवाची मालिका खंडित करण्यास भारत उत्सुक

By admin | Updated: June 5, 2014 00:47 IST

सलग दोन सामन्यांत पराभव स्वीकारणा:या भारतीय संघाला विश्वकप हॉकी स्पर्धेत गुरुवारी स्पेनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

हेग : सलग दोन सामन्यांत पराभव स्वीकारणा:या भारतीय संघाला विश्वकप हॉकी स्पर्धेत गुरुवारी स्पेनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. स्पेनच्या अनुभवी स्ट्रायकर्सपुढे भारतीय संघाची कसोटी लागणार आहे. बेल्जियम व इंग्लंडविरुद्ध अखेरच्या मिनिटाला गोल स्वीकारीत पराभव पत्करणा:या भारतीय संघाला स्पेनविरुद्धच्या लढतीत बचावावर भर द्यावा लागणार आहे. यापूर्वी उभय संघांदरम्यान 2क्13 च्या विश्व लीगच्या उपांत्य फेरीत लढत झाली होती. त्यात स्पेनने पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळविला होता. 
गेल्या दोन वर्षामध्ये आर्थिक अडचणीमुळे स्पेनच्या संघाला प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये सहभागी होता आले नाही, पण त्याचा त्यांच्या कामगिरीवर विशेष प्रभाव पडलेला नाही. सॅन्टी फ्रेक्सिया व एडुअर्ड तबाऊ यांच्यासारखे दिग्गज खेळाडू भारताचा बचाव भेदण्यास सक्षम आहेत. 
भारतीय संघाचे तांत्रिक संचालक रोलँच ओल्टमेन्स म्हणाले, की स्पेनचे दिग्गज खेळाडू भारतापुढे आव्हान निर्माण करण्यास सक्षम आहेत. भारतीय खेळाडू गेल्या दोन सामन्यांतील पराभव विसरून चमकदार कामगिरी करतील, अशी आशा आहे. 
ओल्टमेन्स म्हणाले, की अलीकडच्या कालावधीत स्पेनविरुद्ध खेळण्याचा अनुभव नाही, पण त्यांच्या संघात दज्रेदार खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध विजय मिळविण्यासाठी सांघिक कामगिरीची गरज आहे. भारतीय संघाची गेल्या दोन सामन्यांतील कामगिरी चांगली झाली, पण अखेरच्या क्षणी गोल स्वीकारावा लागल्यामुळे पराभव झाला.
निकाल निराशाजनक असला, तरी कामगिरीमुळे निराश नाही. भविष्यात संघाकडून अपेक्षित निकाल मिळतील. भारतीय संघ कामगिरीत सुधारणा करेल, अशी आशा आहे, असेही ओल्टमेन्स यांनी सांगितले. 
स्पेनचे प्रशिक्षक सल्वाडोर इंडुरेन म्हणाले, की संघाने अद्याप उपांत्य फेरी गाठण्याची आशा सोडलेली नाही. प्रत्येक लढत अंतिम सामन्याप्रमाणो खेळणार आहे. भारतीय संघ कडवा प्रतिस्पर्धी आहे. आमच्या तुलनेत भारतीय संघाचे मानांकन सरस आहे. त्यामुळे ही लढत सोपी नाही.
स्पेन संघातील 8 खेळाडूंना 1क्क् पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. तुबाऊने 269 आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे, तर रेमन अलेग्रेने 256 सामने खेळले आहेत. डेव्हिड अलेग्रे याला 219 सामने खेळण्याचा अनुभव आहे. कर्णधार फ्रेक्सियाने 179 सामने खेळले आहेत, तर गोलकिपर कोर्तेसने 162 सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. रोक ओलावा व मिकेल डेल्लास यांना 1क्क् पेक्षा अधिक सामने खेळण्याचा अनुभव आहे. भारतीय संघात 1क्क् पेक्षा अधिक आंतरारष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव असलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार सरदार सिंग (182 सामने), गुरबाज सिंग, व्ही. आर. रघुनाथ व एस. व्ही. सुनील यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
 
4भारताला या स्पर्धेत अद्याप गुणाचे खाते उघडता आलेले नाही. स्पेनने इंग्लंडला 1-1 ने बरोबरीत रोखत गुणाचे खाते उघडले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्पेनला 3-क् ने पराभव स्वीकारावा लागला.