शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

भारताला मालिका विजयाची संधी

By admin | Updated: July 2, 2017 00:24 IST

सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आत्मविश्वासाचा संचार झालेल्या भारतीय संघाला वेस्ट इंडिज दौऱ्यात आज रविवारी चौथा वन डे जिंकून पाच सामन्यांची

 अँटिग्वॉ : सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आत्मविश्वासाचा संचार झालेल्या भारतीय संघाला वेस्ट इंडिज दौऱ्यात आज रविवारी चौथा वन डे जिंकून पाच सामन्यांची मालिका जिंकण्याची संधी असेल.पहिला वन डे पावसात वाहून गेल्यानंतर, दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात भारताने क्रमश: १०५, तसेच ९३ धावांनी आकर्षक विजय मिळवीत २-० अशी आघाडी घेतली. विंडीज संघ कामगिरी करण्यात अपयशी तर ठरलाच, पण आतापर्यंत संघर्ष करताना दिसत आहे. या संघाची वाटचाल पाहता कोहली अ‍ॅन्ड कंपनीला मालिकेत ४-० ने विजय मिळाला तर आश्चर्य वाटू नये. भारताने विंडीज दौऱ्यात सर्वच आघाड्यांवर यशस्वी कमागिरी केली आहे. फलंदाजांनी धावा काढल्या, तर गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करीत प्रतिस्पर्धी फलंदाजांना जाळ्यात ओढले. अजिंक्य रहाणे याने ६२, १०३ आणि ७२ धावा ठोकून संधीचा पुरेपूर लाभ घेतला आहे. शिखर धवन तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला असला, तरी त्याने प्रभावित केले. तिसऱ्या लढतीत मधल्या फळीलादेखील प्रतिभा दाखविण्याची संधी मिळाली. धवन आणि कोहली लवकर बाद झाल्यानंतर धोनीने ७८ धावांची नाबाद खेळी करीत डाव सावरला. युवराजच्या ३९ धावा त्याचा आत्मविश्वास उंचाविणाऱ्या ठरल्या. केदारनेदेखील २६ चेंडूंत नाबाद ४० धावा ठोकून झटपट फटकेबाजीची क्षमता सिद्ध केली. दुसरीकडे जेसन होल्डरच्या नेतृत्वाखालील यजमान संघाला फलंदाजी आणि गोलंदाजीत भारतावर वरचढ होण्याचे डावपेच कळले नसावेत. युवा खेळाडूंचा संघात भरणा आहे. पण अनुभवात खेळाडू फार कमी पडतात, असे चित्र पाहायला मिळाले. चौथ्या सामन्यात कोहली अंतिम एकादशमध्ये बदल करतो का, हे पाहणे रंजक ठरेल. बदल झाल्यास दिनेश कार्तिक, रिषभ पंत आणि मोहम्मद शमी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)उभय संघभारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, कुलदीप यादव, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, मोहंमद शमी आणि रवींद्र जडेजा.वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), सुनील अंबरिश, देवेंद्र बिशू, रोस्टन चेज, मिगुएल कमिन्स, केली होप, शाय होप, अल्जारी जोसेफ, एविन लुईस, जेसन मोहम्मद, अ‍ॅश्ले नर्स, रोवमॅन पॉवेल आणि केसरिक विलियम्स.काही बदल शक्य : कोहलीविंडीजविरुद्ध सध्याच्या मालिकेत आतापर्यंत खेळण्याची संधी न मिळालेल्या खेळाडूंना संधी देण्याच्या इराद्याने काही बदल शक्य असल्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले. रिषभ पंत, मोहम्मद शमी आणि दिनेश कार्तिक हे आतापर्यंत राखीव बाकावर बसून आहेत. या सर्वांचा चौथ्या सामन्यासाठी विचार होऊ शकतो.मी जुन्या मद्यासारखा - धोनी : मद्य जितके जुने (ओल्ड वाईन) असेल तितके ते चविष्ट आणि महागडे असते. अशा मद्याची किंमतही अधिक असते. फलंदाजीतील माझा फॉर्मही असाच आहे. मी तर जुन्या मद्यासारखा असल्याची प्रतिक्रिया महेंद्रसिंग धोनी याने सामन्यानंतर व्यक्त केली. वाढत्या वयासोबत फलंदाजी अधिक उत्कृष्ट होत असल्याकडे लक्ष वेधताच धोनी म्हणाला, ‘माझ्या यशाचे तंत्र मद्यासारखे आहे. कठीण खेळपट्टीवर धावा काढल्याचे समाधान त्याच्या शब्दात होते. दीड वर्षांपासून आघाडीचे फलंदाज धावा काढत आहेत. संधी मिळणे आणि धावा काढणे हा योगायोग आहे. २५० धावा फळ्यावर लावणे माझे टार्गेट होते. केदारच्या सोबतीने त्यात यशस्वी ठरलो.झटपट क्रिकेटमधील स्वत:च्या क्षमतेवर अटळ राहिलो मर्यादित षटकांच्या सामन्यात मला उशिरा संधी मिळाली. झटपट धावा काढण्याबाबत माझ्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याने वन डे क्रिकेटसाठी प्रतीक्षेत असताना स्वत:च्या क्षमतेवरील विश्वास मात्र कायम राखल्याचे मत अजिंक्य रहाणेने व्यक्त केले आहे. विंडीज दौऱ्यात रोहितच्या अनुपस्थितीत तिन्ही सामन्यात डावाचा प्रारंभ करणाऱ्या अजिंक्यने ६२, १०३ आणि ७२ धावांची दमदार खेळी केली. वन डे सामन्यात अंतिम एकादशमधून वगळल्याबद्दल खेद वाटायचा का, असे विचारताच रहाणे म्हणाला, ‘ माझा विश्वास ढळला नव्हता. चांगल्या आणि सातत्यपपूर्ण धावा काढण्यासाठी मी केवळ संधीच्या शोधात होतो.’मला सलामीला पाठविल्याबद्दल कोहली आणि व्यवस्थापनाचे आभार मानतो.’सावध सुरुवातीनंतर वेगवान धावा काढण्यात अडसर येतो का, असे विचारताच तो म्हणाला,‘ सुरुवातीला थोडा वेळ लागतो पण परिस्थिती नियंत्रणात येताच सहजपणे वेगवान फटकेबाजी करू शकतो.’ खेळपट्टीचे स्वरूप पाहून फटकेबाजी करण्याचा निर्णय घ्यावा लागतो, असे अजिंक्यचे मत आहे. (वृत्तसंस्था)