शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

भारताचा सामना चीनशी

By admin | Published: May 26, 2017 3:29 AM

सुदीरमन कप बॅडमिंटन स्पर्धेच्या बाद फेरीत स्थान पटकावणाऱ्या भारतीय संघाला शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत चीनचा अडथळा दूर करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.

गोल्ड कोस्ट (आॅस्ट्रेलिया) : सुदीरमन कप बॅडमिंटन स्पर्धेच्या बाद फेरीत स्थान पटकावणाऱ्या भारतीय संघाला शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत चीनचा अडथळा दूर करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.यापूर्वी, २०११मध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या भारताला चीनकडून १-३ ने पराभवाचा धक्का बसला होता. स्पर्धेच्या २८ वर्षांच्या इतिहासात इंडोनेशिया संघ प्रथमच बाद फेरीपासून वंचित राहिला, हे विशेष. चीन संघात दोन वेळचा आॅलिम्पिक सुवर्णविजेता लीन दान आणि रिओ आॅलिम्पिकचा सुवर्ण विजेता चेन लोंग यांचा समावेश आहे. पुरुष एकेरीत या दोघांना नमविणे भारतासाठी कडवे आव्हान असेल. भारतीय खेळाडूंपैकी केवळ के. श्रीकांत यानेच लीन दानला नमविले आहे. २०१४ च्या चायना ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीकांतने ही कामगिरी केली होती. महिला एकेरीत आॅलिम्पिक रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू हिच्यापुढेही खडतर आव्हान आहे. तिचा सामना जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावरील ही बिंगजियाओ किंवा सहाव्या स्थानावरील सून यू यांच्यापैकी एकीशी होईल. सिंधू मागच्या महिन्यात आशियाई चॅम्पियनशिपमध्ये बिंगजियाओकडून पराभूत झाली. सूनविरुद्ध तिचा रेकॉर्ड ३-४ असा आहे. अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांनादेखील कडवे आव्हान मिळणार आहे. दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात जपानचा सामना होईल तो मलेशिया विरुद्ध. (वृत्तसंस्था)