शिवाजी गोरे
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. 8 - सुरूवातीपासून चुरशीच्या झालेल्या पुरूषांच्या ब गटातील साखळी सामन्यात भारताला जर्मनीकडून १-२ गोलने पराभव पत्करावा लागला. शेवटच्या तीन सेकंद पर्यंत बरोबरी असलेल्या या लढतीत जर्मनीच्या ख्रिस्टिफर रूहाने अफलातून गोल करीत साखळीतील पहिला सामन्या जिंकल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय खेळाडूंनी सुरुवातीला जलद खेल करण्यास सुरुयात केली. जर्मनीचे खेळाडू आक्रमक खेल होते. त्यांच्या चढाया रोखण्यासाठी भारती बचाव फळीला प्रयत्नांची पराकाष्ठ करावी लागत होती. पहिला क्वाटर गोल शून्य बरोबरीत संपला. नंतर दुसºया क्वाटरमध्ये तिसºयाच मिनिटाला (एकूण १८ व्या) जर्मनीच्या निकलस वेलीनने आपल्या संघाचा पहिला गोल करून आपल्या संघाला १-० अशी बरोबरी मिळून दिली. नंतर भारतीय खेळाडूंनी सुध्दा काही उत्कृष्ट चाली रचल्या. अशीच एक चाल रचताना जर्मनीच्या खेळाडूकडून चेंडू त्याच्याच डि जवळून बाहेर मारला गेला. २३ व्या मिनिटाला भारतीय संघाला पेनेल्टी कॉर्नर मिळाला. या संधीचा फायदा भारतीय खेळाडूंनी घेत. त्यांच्या रुपिंदर पाल सिंगने कोणतीही चूक न करता चेंडू जर्मनीच्या गोलमध्ये मारत आपल्या संघाला बरोबरी करून दिली. नंतर मात्र दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करण्यास सुरूवात केली. तिसºया क्वाटरमध्ये कोणताच संघ गोल करून शकला नाही. शेवटच्या क्वाटरमध्ये दोन्ही संघ एकमेकांविरूध्द गोल करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठ करीत होते. दोन्ही संघाची बजावफळी भक्कम असल्यामुळे गोल करण्याची संधी कोणाला मिळत नव्हती. शेवटी जर्मनीच्या आघाडीच्या फळीने जलद खेळ सुरु केला. त्यातच शेवटचे तीन सेकंद बाकी असताना त्यांच्या ख्रिस्टिफोरला मिळालेल्या संधीचा त्यांना कोणतीही चूक नकरता श्रीजेसला चकवीत चेंडू गोलमध्ये टाकून आपल्या संघाला विजयी मिळून दिला. भारताचा ब गटातील हा दुसरा सामना होता. पहिला सामने त्यांनी आर्यलंडविरूध्द जिंकला आहे.