शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

पहिल्याच सामन्यात भारत पराभूत, ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून विजय

By admin | Updated: January 12, 2016 16:45 IST

स्टीव्ह स्मिथ (१४९) व जॉर्ज बेलीच्या (११२) शानदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतावर ५ गडी राखून विजय मिळवला.

ऑनलाइन लोकमत
पर्थ, दि. १२ - कर्णधार स्टीव्ह स्मिथ (१४९) आणि जॉर्ज बेली (११२) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ४ चेंडू व ५ गडी राखून  पराभव केला. भारताच्या ३१० धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने ४९.२ षटकांत ५ गडी गमावत पूर्ण केल्याने पहिल्या सामन्यातच भारताल पराभवाचा धक्का बसला. भारतातर्फे सरनने ३ तर अश्विनने २ बळी टिपले.  दरम्यान या पराभवामुळे भारताचा सलामीवीर रोहित शर्माची नाबाद १७१ धावांची खेळी वाया गेली. 
भारताच्या ३१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात अडखळत झाली, प्रारंभीच फिंच (८) आणि वॉर्नरच्या (५) रुपाने दोन बळी मिळाल्याने भारताच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. मात्र त्यानंतर आलेला जॉर्ज बेली आणि स्टीव्ह स्मिथ यांनी भारतीय गोलंदाजी चोपून काढत शतके झळकावली आणि ऑस्ट्रेलियाला विजयाच्या समीप नेले. ११२ धावांवर खेळताना बेली अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला २६३ धावांवर तिसरा धक्का बसला तर त्यानंतर अवघ्या १० धावांनंतर २७३ धावांवर मॅक्सवेलच्या (६) रुपाने ऑस्ट्रेलियाचा चौथा गडी गमावला. त्यानंतरही कर्णधार स्मिथने फटकेबाजी सुरूच ठेवत ऑस्ट्रेलियाला विजयाच्या अगदी समीप नेले, मात्र दीडशतकापासून अवघ्या एका धावेच्या अंतरावर असताना तो (१४९) सरनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ५ चेंडूमध्ये अवघ्या २ धावांची गरज होती. त्यानंतर मार्श (१२) आणि फॉकनरने (१) विजयाची औपचारिकता पूर्ण केली आणि ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिला विजय नोंदवला.
तत्पूर्वी सलामीवीर रोहित शर्माच्या १७१ तर विराट कोहलीच्या ९ धावांच्या जोरावर भारताने ३०९ धावा केल्या. ले आहे. ऑस्ट्रेलियातर्फे फॉकनरने २ तर हेझलवूडने १ बळी टिपला.