शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

अर्जेंटिनाकडून भारत ३-० गोलने पराभूत

By admin | Updated: November 27, 2015 23:49 IST

स्टार खेळाडू पेइलेट गोंझालो याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर अर्जेंटिनाने यजमान भारताला ३-०ने सहज नमवित वर्ल्ड हॉकी लीग फायनल स्पर्धेच्या

रायपूर : स्टार खेळाडू पेइलेट गोंझालो याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर अर्जेंटिनाने यजमान भारताला ३-०ने सहज नमवित वर्ल्ड हॉकी लीग फायनल स्पर्धेच्या उद््घाटनाचा दिवस गाजविला. रायपूरच्या वल्लभाई पटेल स्टेडियमवर हा सामना झाला. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या अर्जेंटिनाने सुरूवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व ठेवत भारताला एकही संधी दिली नाही. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटास पेनल्टी कॉर्नरद्वारे मिळालेल्या संधीचे सोने करीत गोंझालोने संघाला १-०अशी आघाडी मिळवून दिली. तर सामन्याच्या २४व्या मिनिटास पेनल्टी कॉर्नरवर जोआक्विन मिनेनी याने गोल करीत आघाडी २-० अशी वाढविली. दुसरीकडे भारताचा स्टार मिडफिल्डर सरदारसिंह याच्या नेतृत्वाखील उतरलेल्या भारताच्या संघाकडून फारसा प्रतिकारही दिसला नाही. दुसऱ्या हाफमध्ये रमनदीप, रघुनाथ, रुपींदर यांनी अर्जेंटिनावर काहीसा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताचे आक्रमण थोपविण्यात अर्जेंटिनाला यश आले. रुपींदरला ५०व्या मिनिटास पेनल्टीकॉर्नरद्वारे गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र या संधीचे तो गोलमध्ये रुपांतर करु शकला नाही. अर्जेंटिनाने आपले आक्रमण सुरुच ठेवत चेंडूवर अधिक ताबा ठेवला. सामन्याच्या ६०व्या मिनिटास पेनल्टीकॉर्नरवर गोंझालोने वैयक्तिक दुसरा गोल करीत संघाची आघाडी ३-० अशी भक्कम करीत संघाचा विजय देखिल निश्चित केला.आता भारताची पुढची लढत शनिवारी जर्मनीशी होईल.