शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

भारताची वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत धडक, न्यूझीलंडवर 186 धावांनी विजय

By admin | Updated: July 15, 2017 21:36 IST

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्यफेरी गाठण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 186 धावांनी विजय मिळवला.

 ऑनलाइन लोकमत 

डर्बी, दि. 15 - महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्यफेरी गाठण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 186 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव 79  धावात संपुष्टात आला.  न्यूझीलंड विरुद्धचा हा सामना भारतासाठी "करो या मरो" होता. राजेश्वरी गायकवाडने आठ षटकात 15 धावा देत न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. 
 
भारताने या विजयासह उपांत्यफेरी गाठली असून, उपांत्यफेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होईल.  न्यूझीलंडच्या सॅटरवेटचा (26) अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजीसमोर सपशेल नांगी टाकली. डीबी शर्माने दोन, झुलन गोस्वामी, पांडे आणि पूनम यादवने प्रत्येकी एक गडी बाद केला. 
 
तत्पूर्वी भारताने कर्णधार मिथाली राजचे शानदार शतक (109) आणि वेदा कृष्णमुर्तीची स्फोटक फलंदाजी (70) यांच्या बळावर न्यूझीलंडला विजयासाठी 266 धावांचे लक्ष्य दिले होते.या महत्वाच्या सामन्यात एस.मनधाना (13) आणि पूनम राऊत (4) यांची सलामीची जोडी अपयशी ठरली. 
 
त्यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार मिथाली राजने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत एच. कौरच्या साथीने तिस-या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी केली. कौरने अर्धशतक फटकावताना (60) धावा केल्या. कौर बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या डीबी शर्माला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर मैदानात आलेल्या वेदा कृष्णमुर्तीने स्फोटक फलंदाजी केली. 45 चेंडूत (70) धावा फटकावल्या. तिच्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. 
 
आणखी वाचा 
मिताली राजने रचला इतिहास, सचिन-धोनीसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे
मराठमोळ्या पूनम राऊतचं शतक
तमीम इक्बालवर इंग्लंडमध्ये अॅसिड हल्ला, टुर्नामेंटमधून घेतली माघार
 
मिथालीसह तिने पाचव्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. वर्ल्डकपमध्ये खो-याने धावा काढणा-या मिथाली राजने 123 चेंडूत (109) धावांची शतकी खेळी केली. तिने 11 चौकार लगावले. सलग दोन पराभवांमुळे खचलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघापुढे महिला विश्वचषक क्रिकेटची उपांत्य फेरी गाठण्यासाठी आज शनिवारी न्यूझीलंडवर विजय नोंदविण्याचे आव्हान होते. 
 
गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी हा सामना जिंकावाच लागणार होता. पाठोपाठ चार विजय नोंदविल्यानंतर द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचे तोंड पहावे लागले होते. इंग्लंड, द. आफ्रिका तसेच गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने आधीच उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे.