शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
2
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
3
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
4
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
5
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
6
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
7
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
8
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
9
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
10
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
11
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
12
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
13
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
14
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
15
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
16
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
17
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
18
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
19
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
20
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...

भारताचा मलेशियावर विजय

By admin | Updated: November 16, 2015 02:42 IST

हरमनप्रितसिंह आणि मनदीपसिंह यांच्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर भारताने आठव्या ज्युनियर हॉकी आशिया कप स्पर्धेत विजयी अभियान कायम ठेवले

कुआनतान (मलेशिया) : हरमनप्रितसिंह आणि मनदीपसिंह यांच्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर भारताने आठव्या ज्युनियर हॉकी आशिया कप स्पर्धेत विजयी अभियान कायम ठेवले. रविवारी झालेल्या या सामन्यात भारताने मलेशियाला ग्रुप एमध्ये ५-४ ने पराभूत केले.भारतीय संघाने पहिल्या सामन्यात जपानला २-१ ने पराभूत केले होते. मलेशियाविरुद्ध झालेल्या या सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये भारत १-२ असा पिछाडीवर होता. दुसऱ्या हाफमध्ये भारताने जबरदस्त खेळ केला. त्यानंतर भारताने २१ मिनिटांत चार गोल केले आणि यजमान संघासमोर आव्हान निर्माण केले. त्यानंतर हा सामना ५-४ असा जिंकला. या सामन्यात मलेशियाच्या शाहरिल सबाह याने पहिल्या मिनिटात गोल करून आघाडी घेतली. मात्र मनदीप याने दहाव्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली. शाहरिल याने २० मिनिटांत मलेशियाला २-१ आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये चाळीस मिनिटांत गुरजंतसिंह याने मैदानी गोल करून भारताला २- २ अशी बरोबरी साधून दिली. जपानविरोधात दोन गोल करणारा ड्रॅगफ्लिकर हरमनप्रितसिंहने ४६ आणि ५६ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल करीत भारताला ४-२ अशी आघाडी मिळवून दिली. मनदीपने ६१ व्या मिनिटाला आपला दुसरा आणि भारताचा पाचवा गोल केला. त्या वेळी ५-२ अशी अवस्था होती. मात्र मलेशियाच्या खेळाडूंनी त्यानंतर पुन्हा जबरदस्त खेळ केला. इस्मत सुफी रोहुल्लामीन याने ६२ व्या आणि शाहरिल याने ६६ व्या मिनिटाला पुन्हा गोल केला. त्या वेळी ५-४ अशी अवस्था होती. मंगळवारी भारताचा सामना चीनशी होणार आहे. (वृत्तसंस्था)