शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
3
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
4
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
5
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
6
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
7
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
8
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
9
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
10
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
11
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
12
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
13
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
14
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
15
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
16
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
17
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
18
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
19
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
20
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!

खऱ्याअर्थाने विजय कबड्डीचाच!

By admin | Updated: August 23, 2015 02:08 IST

पहिल्या पर्वात अग्निपरीक्षा पुरेशी नव्हती तर दुसऱ्या पर्वात खरी अग्निपरीक्षा पुढे होती. निकालही शानदार. भारताच्या या प्राचीन खेळाच्या यशस्वी आयोजनाचा उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे.

- चारु शर्मा...पहिल्या पर्वात अग्निपरीक्षा पुरेशी नव्हती तर दुसऱ्या पर्वात खरी अग्निपरीक्षा पुढे होती. निकालही शानदार. भारताच्या या प्राचीन खेळाच्या यशस्वी आयोजनाचा उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. प्रो-कबड्डी लीग लोकांच्या मनापासून पचनी पडत आहे.देशभरातून आलेल्या प्रतिक्रियांमधून हे स्पष्ट होऊ लागले. भारतीयांना या खेळाचे नवे रूप पचनी पडले. शहरातील युवावर्ग उत्तर रात्री घरी परतण्याचे विसरून गेला. महिलादेखील कबड्डी नाईटचा आनंद लुटत आहेत. आपल्याकडे या खेळाशी संबंधित काही ना काही प्रतिक्रिया असतील, अशी मला आशा आहे. आमच्यासोबत आपल्या आठवणी शेअर करा. प्रेक्षकांनी खच्चून भरलेले स्टेडियम आणि शानदार रेटिंग नजरेपुढे आहेच. स्टार स्पोर्टस्ने आपल्या प्रमोशन्सद्वारे पुन्हा एकदा अपेक्षा वाढविल्या. विशेषत: स्पर्धेचे प्रॉडक्शन अप्रतिम आणि स्टेडियममधील अनुभव देखील हाय व्होल्टेजच! टीव्हीवरील शानदार अ‍ॅक्शन, समर्पित समालोचक, ग्राफिक्स, साऊंड या सर्वांचे एकत्रितपणे आकर्षक ‘कॉकटेल’ बनले. मग उणीव कुठे आहे? माझ्यामते काहीही उणीव नाही!यशस्वी प्रॉडक्टसोबत कोण जुळणार नाही. खरेतर आम्ही सर्वजण या प्लॅटफॉर्मवर आनंदी आहोत. स्टार स्पोर्टस्ने या भारतीय खेळाला जे रूप दिले त्यामुळे आमचे सर्वांचे उद्दिष्ट सफल होऊ शकले याचा आनंद मोठा आहे. स्टार स्पोर्टस् या वाहिनीने मातीतला खेळ नव्या रूपात जगापुढे ठेवला. याचा मोठा लाभ खेळाडूंना झाला. खरेतर खेळाडू या लाभाचे हकदार आहेतच. परिश्रम करणाऱ्या नम्र आणि मानसिक कणखरता जोपासणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळत आहे. आज जे स्टारडम त्यांना लाभले ते त्यांच्या मेहनतीचे ‘रिटर्न ’ आहे. बक्षिसांची रक्कम देखील मागच्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट होऊन दोन कोटीवर पोहोचली.विजेता संघ एक कोटी रुपये घेऊन जाईल. फायनलमध्ये दाखल होणाऱ्या संघाला ५० लाख मिळतील. तिसऱ्या स्थानावरील संघाला ३० लाख तसेच चौथ्या स्थानावरील संघाला २० लाख रुपयांचा लाभ होईल. स्पर्धेतील मोस्ट ‘व्हॅल्युएबल प्लेयर’ला महिंद्रा कार मिळेल. स्टार स्पोर्टस् प्रो-कबड्डीच्या या पर्वाने अनेक युवा आणि भविष्यातील स्टार खेळाडूंना पुढे आणले आहे. यामुळे हजारो युवा खेळाडू प्रेरणा घेतील. पटना पायरेट्स आणि तेलगू टायटन्स यांच्यात तिसऱ्या स्थानासाठी लढत झाली. रविवारी यू मुंबाविरुद्ध बेंगळुरु बुल्स असा अंतिम सामना रंगणार आहे. माझ्यामते मात्र या खेळाचा आधीच विजय झाला. आपण सर्वजण कबड्डीच्या या आंदोलनात सहभागी झालात याबद्दल मनापासून धन्यवाद ! (टीसीएम)